Join us

वडिलांचे स्मरण करून भावुक झाला शाहरूख खान; ट्विटरवर व्यक्त केल्या भावना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 4:50 PM

शाहरूख खान त्याच्या तिन्ही मुलांच्या खूप क्लोज आहे. बºयाचदा तो त्याच्या मुलांवरून इमोशनल झाल्याचेही बघावयास मिळाले आहे. आज त्याने ...

शाहरूख खान त्याच्या तिन्ही मुलांच्या खूप क्लोज आहे. बºयाचदा तो त्याच्या मुलांवरून इमोशनल झाल्याचेही बघावयास मिळाले आहे. आज त्याने एक ट्विट करून हे सिद्ध केले की, तो त्याच्या मुलांबरोबरच त्याच्या वडिलांनाही किती मिस करतो. होय, शाहरूखने आज (दि.१९) वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर एक भावनिक ट्विट करीत वडिलांना स्मरण केले. वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना शाहरूखने लिहिले की, ‘माझे कर्तव्यच हेच आहे की, जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत मी माझ्या दोन्ही मुलांचे बालपण कायम ठेवणार’शाहरूखच्या वडिलांचे निधन कॅन्सर या आजाराने झाले होते. त्यावेळी शाहरूख १५ वर्षांचा होता. शाहरूखवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना वडिलांच्या मृत्यूचा धक्का त्याची आई सहन करू शकली नाही. त्यांचेदेखील काही दिवसांनंतर निधन झाले. आई-वडिलांच्या निधनामुळे शाहरूखची मोठी बहीण शहनाजही डिप्रेशनमध्ये गेली. त्यावेळी शाहरूखवर जो प्रसंग ओढावला होता, तो खरोखरच भयावह होता. परंतु अशातही त्याने जिद्दीने स्वत:ला सावरत आयुष्यात यश मिळविले. शाहरूख बºयाचदा त्याच्या वडिलांना स्मरण करून भावुक होताना बघावयास मिळाला आहे. शाहरूखला तीन मुले असून, तो तिन्ही मुलांवर जीवापाड प्रेम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मुलांची जबाबदारी असल्याचे आणि त्याचा चिमुकला शहजादा अबरामच्या जन्मानंतर दीर्घायुष्य हवे असल्याचे म्हटले होते. वास्तविक शाहरूख अबरामच्या खूपच क्लोज आहे. आर्यन आणि सुहाना मोठे झाले असून, ते सध्या शिक्षण घेत आहेत. अशात शाहरूखला अबरामची चिंता वाटणे स्वाभाविक असून, तो शक्य होईल तेव्हा अबरामला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे केवळ मुलांसाठी तो स्मोकिंग आणि ड्रिंकिंगपासून दूर जाऊ इच्छित आहे.