Join us  

'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 2:11 PM

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन 'कतार'मध्ये करणार असल्याची चर्चा आहे.

शाहरुख खानने त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.किंग खानने पठाणला जागतिक बाजारपेठेत प्रमोट करण्याचा उत्तम मार्ग शोधला आहे. फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन कतार मध्ये करणार असल्याची चर्चा आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये करणार प्रमोशनशाहरुख खानचं फॅनपेज ‘Shah Rukh Khan Universe Fan Club’वर असा दावा केला जात आहे. शाहरुख कतारमधील फायनलचा भाग बनतो की प्री-फायनल टेलिकास्ट टीममध्ये सामील होतो हे पाहणे बाकी आहे. फिफा विश्वचषक फायनल 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. दीपिका पादुकोण फिफा विश्वचषक २०२२ च्या ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याची चर्चा आहे. अर्जेंटिनाने फिफाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दुसऱ्या संघाची घोषणा अद्याप व्हायची आहे.

'पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

 

टॅग्स :शाहरुख खानदीपिका पादुकोणफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२