बॉलिवूड किंग खान म्हणजे शाहरूख खान रोमान्स किंग नावाने लोकप्रिय आहे. किंग खानच्या रोमॅंटिक अंदाजाचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे दोन्ही बाहू फैलावून करत असलेली त्याची आयकॉनिक स्टाइल. त्याची ही स्टाइल फारच पॉप्युलर आहे. त्याच्या या अंदाजावर लाखों फॅन्स फिदा आहेत. पण स्वत: शाहरूख खान त्याच्या या स्टाइलला घाबरतो. आज शाहरूख खानच्या ५५व्या वाढदिवसानिमित्ताने जाणून त्याच्या या आयकॉनिक स्टाइलची सुरूवात कशी झाली आणि त्याला त्याची भीती का वाटते...
शाहरूख खानच्या या आयकॉनिक म्हणा किंवा सिग्नेचर स्टेपची सुरूवात 'बाजीगर' सिनेमापासून झाली होती. प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी बाजीगर सिनेमातील 'बाजीगर ओ बाजीगर' या गाण्यात ही स्टेप दिली होती. इथूनच ही शाहरूख खानची सिग्नेचर स्टेप झाली होती आणि त्याच्या रोमॅंटिक अंदाजाची आय़कॉनिक स्टेपही. या स्टेपशिवाय शाहरूखचा कोणताही परफॉर्मन्स अपुरा मानला जातो. (बाबो..! शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये कधीच भरत नाही बिल, जाणून घ्या यामागचं कारण)
शाहरूखला होती हात कापण्याची भीती
शाहरूख खानने एका शोमध्ये त्याला वाटत असलेल्या सर्वात मोठ्या भीतीचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, त्याला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची सर्वात जास्त भीती वाटते. या भीतीमागचं कारण शाहरूखने सांगितलं होतं की, त्याला भीती आहे की कुणी त्याचे हात कापू नये. ही त्याची भीती फारच विचित्र आहे. पण भीती तर भीती आहे. शाहरूख म्हणाला होता की, तो टेलरकडे जेव्हा मेजरमेंट देतो तेव्हा नर्व्हस होतो. हात वर करताना त्याला फारच असहजता वाटते. (२ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खान कमबॅकसाठी सज्ज, साईन केले तीन प्रोजेक्ट्स)
चर्चा तर अशीही होती की, शाहरूखला त्याचं स्टारडम गमावण्याची जास्त भीती आहे. पण ही चर्चा चुकीची असल्याचं शाहरूखने सांगितलं होतं. शाहरूखने त्याला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची जास्त भीती वाटते असं सांगितलं होतं. त्याच्या या आयकॉनिक स्टाइलला भलेही बाजीगरमधून लोकप्रियता मिळाली असेल, पण 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधून त्याचा हा अंदाज सर्वात जास्त गाजला.