Join us

'बाजीगर'मध्ये शाहरुखच्या बॉडी डबलने केलं होतं काम; बऱ्याच वर्षानंतर सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 1:58 PM

ShahRukh Khan: बाजीगर सिनेमात शाहरुख लीड रोलमध्ये होता. त्यामुळे सहाजिकच सुपरमॅनच्या गेटअपमध्ये घोड्यावर बसून आलेला व्यक्तीसुद्धा शाहरुखच असेल असं सगळ्यांना वाटलं होतं.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (shahrukh khan) याचा 'बाजीगर' हा सिनेमा सगळ्यांनाच ठावूक आहे. हा सिनेमा कलाविश्वात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमामध्ये शाहरुखचा एक सीन होता. ज्यात त्याने काळ्या रंगाचे कपडे, टोपी आणि आयमास्क घातला होता. या लूकमध्ये तो घोड्यावर बसून वाऱ्याच्या वेगाने आला होता. विशेष म्हणजे त्याचा हा सीन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांनी अक्षरश: शिट्ट्या वाजवल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात पाहायला गेलं तर घोड्यावर बसलेला हा व्यक्ती शाहरुख नसून एक दुसराच व्यक्ती होता.

बाजीगर सिनेमात शाहरुख लीड रोलमध्ये होता. त्यामुळे सहाजिकच सुपरमॅनच्या गेटअपमध्ये घोड्यावर बसून आलेला व्यक्तीसुद्धा शाहरुखच असेल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तो शाहरुन नसून त्या घोड्याचा खरा मालक होता. त्यामुळे या सिनेमासाठी बॉडी डबलचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं.

'बाजीगर' हा सिनेमा शाहरुखच्या करिअरमधील महत्त्वाचा भाग आहे. या सिनेमामध्ये त्याने पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारली होती. या भूमिकेकडे अनेक सुपरस्टारने पाठ फिरवली होती. मात्र, शाहरुखने हे आव्हान स्वीकारलं. अलिकडेच  Abbas-Mustan यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शाहरुखच्या बॉडी डबलचा वापर केल्याचा खुलासा केला.

शाहरुखला हॉर्स रायडिंगची प्रचंड भीती वाटते. त्यामुळेच या सिनेमात शाहरुखच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला होता. या गाण्यात शाहरुख ऐवजी या घोड्याच्या खऱ्या मालकाने तो सीन शूट केला होता, असं Abbas-Mustan  यांनी सांगितलं.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी बाजीगरच्या सिक्वलविषयीदेखील भाष्य केलं. जर कोणाकडे चांगली कथा असेल तर नक्कीच या सिनेमाचा सिक्वल काढू, असं मुस्तान म्हणाले. विशेष म्हणजे याच सिनेमामुळे शाहरुखला खिलाडी, बादशाह ही टोपणनावदेखील मिळाली. 

 

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानसेलिब्रिटीसिनेमा