Join us

कमाईमध्ये शाहरुखचा बॉडीगार्ड ठरतो 'किंग'; कोटयवधी पगार घेऊन ठरला इंडस्ट्रीचा हायपेड बॉडीगार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 08:39 IST

Ravi singh: शाहरुख त्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतो त्यामुळे तो रवीला सुद्धा सुरक्षा पुरवण्यासाठी वर्षाकाठी कोटयवधी रुपये पगार देतो.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याच्या लोकप्रियतेविषयी कोणालाही नव्याने काही सांगायची गरज नाही. देशासह विदेशातही त्याची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे सहाजिकचं त्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. यात गेल्या कित्येक वर्षांपासू रवी शर्मा हा त्याच्या बॉडीगार्डचं काम करतोय. विशेष म्हणजे रवी शाहरुखला सुरक्षा पुरवण्यासाठी रग्गड पगार घेतो. शाहरुख त्याला एका महिन्यासाठी जी रक्कम देतो ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून रवी, शाहरुखला सुरक्षा पुरवण्याचं काम करत आहे. त्यामुळे तो आज किंग खानच्या घरातील एक प्रकारे सदस्यचं झाला आहे. अनेकदा रवी, शाहरुखच्या मुलांनादेखील सुरक्षा पुरवतांना दिसून येतो. त्यामुळे शाहरुखसोबत कुटुंबाप्रमाणे राहणाऱ्या रवीला किंग खान मानधन सुद्धा तितकंच देतो. इतकंच नाही तर या सर्वाधिक पगार घेऊन रवी इंडस्ट्रीतील सर्वात महागडा बॉडीगार्ड ठरला आहे.

कमाईच्या बाबतीत रवीने टाकलं सलमानच्या शेरालाही मागे

आतापर्यंत सलमान खानचा बॉडीगार्ड सर्वात महागडा बॉडीगार्ड असल्याचं म्हटलं जात होतं. शेरा जवळपास २९ वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. या कामासाठी सलमान त्याला १५ लाख रुपये महिन्याला देतो. परंतु, शाहरुख त्याच्या बॉडीगार्डला शेरापेक्षाही जास्त मानधन देतो.

किती आहे रवीचा एका महिन्याचा पगार

गेल्या १० वर्षांपासून रवी सिंह हा शाहरुखच्या बॉडीगार्डचं काम करत आहे. त्यामुळे शाहरुख त्याला वर्षाकाठी ३ कोटी रुपये पगार देत असल्याचं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख, रवीला महिन्याला २५ लाख रुपये मानधन देतो.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खानसिनेमा