Join us  

बाप-लेक एकाच चित्रपटात, सुहानासोबत स्क्रीन शेअर करणार शाहरुख...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 9:01 PM

Shah Rukh Khan Daughter Suhana Khan: 'पठान'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल.

Shah Rukh Khan And Suhana Khan Film: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार आहे. ती दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून पदार्पण करत असून, हा चित्रपट नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे. सुहानाने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. या दरम्यान अशी बातमी येत आहे की, लवकरच शाहरुख आणि सुहाना एका चित्रपटात काम करणार आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या पठाणला जबरदस्त यश मिळाले. चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम नोंदवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद याने केले होते. पिंकविलाने दिलेल्या बातमीनुसार, शाहरुख आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. मात्र, यावेळी शाहरुख निर्माता म्हणून सिद्धार्थसोबत असेल.

सुहाना खान मुख्य भूमिकेत असणार या चित्रपटाचे नाव काय असेल, हे अद्याप ठरलेले नाही, मात्र शाहरुखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट याची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले असून वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना मुख्य भूमिकेत असेल आणि हा तिचा पहिला थिएटर डेब्यू चित्रपट असेल. 

या चित्रपटात सुहानासोबत शाहरुख देखील दिसणार आहे. तो एका खास लॉन्ग कॅमिओ भूमिकेत असेल. सध्या तरी या चित्रपटाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या शाहरुख त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाणनंतरचा हा त्याचा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड