एकीकडे शाहरूख खान (Shah Rukh Khan) बॅक टू बॅक चित्रपटांत बिझी आहे. दुसरीकडे त्याची लाडकी लेक सुहाना खान ( Suhana Khan ) बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपटातून सुहाना डेब्यू करतेय. याचदरम्यान सुहानाच्या गजब ट्रॉन्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘द आर्चीज’ गर्ल हा अनोखा अंदाज पाहून सगळेच थक्क आहेत.
सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहानाने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. क्रॉप टॉप व ब्ल्यू जीन्समधील तिच्या या फोटोत तिने परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केलं आहे. तिची हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेतेय.
‘द आर्चीज’ या चित्रपटातून एकाचवेळी तीन स्टारकिड्सचा डेब्यू होतोय. या चित्रपटात सुहाना आहेच. पण तिच्याशिवाय श्रीदेवी व बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही सुद्धा झळकणार आहे. तिचाही या चित्रपटातून डेब्यू होतोय. मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा हा सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या तिघांशिवाय वेदांग रैना, मिहिर आहुजा, युवराज मेंदा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक तुम्ही पाहिला असेलच. पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
‘द आर्चीज’ हे लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्समधील पात्रांना पडद्यावर उभं केलं जाणार आहे. यासाठी 1960 च्या काळातील चित्र उभं केलं जाणार आहे. झोया अख्तर ही या चित्रपटाची दिग्दर्शक आहे. या चित्रपटात सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूर बेट्टीच्या तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये दिसणार आहे.