Join us  

'अभिमान वाटतो..', जुही चावल्याच्या लेकीसाठी शाहरुख खानने केलं खास ट्विट, होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:25 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जान्हवीसाठी एक स्पेशल नोट लिहिली जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी चावला हिने कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.   जुही चावलाने लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. जुहीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला असला तरी जुही चावलाच्या ट्विटला रिट्विट करताना बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जान्हवीसाठी एक स्पेशल नोट लिहिली जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

किंग खानने लिहिली पोस्ट ट्विटरवर जुही चावलाची पोस्ट रिट्विट करत शाहरुख खानने जान्हवीचे अभिनंदन केले आणि लिहिले - 'हे खरोखरच अद्भुत आहे. जान्हवी परत येण्याची आणि एकत्र सेलिब्रेट करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. अभिमान वाटतो. लव्ह यू जान्ज'. 

शाहरुख खान आणि जुही चावला हे बॉलिवूडचे बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखले जातात. दोघांनी पहिल्यांदा डर या चित्रपटात एकत्र काम केले आणि नंतर डुप्लिकेट, येस बॉस, भूतनाथ आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. त्यांची मैत्री फक्त ऑनस्क्रिन नाही तर ऑफस्क्रिनही पक्की आहे. 

जान्हवी आई जुहीसारखी हुबेहुब दिसते. मात्र, जान्हवी मेहताला तिच्या आईप्रमाणे अभिनयात करिअर करायचे नाही. तिला स्पोर्ट्सची आवड आहे आणि तिला लेखक बनायचे आहे. एका मुलाखती दरम्यान जुही चावलाला विचारण्यात आले होते. जान्हवी मेहता सिनेमात काम करण्याचा विचार करत आहे का? तेव्हा जुहीने उत्तर दिलं की,'जान्हवीला पुस्तक वाचण्याचा छंद आहे. जर तिला काही गिफ्ट द्यायचे असेल. किंवा तिला मनापासून काय आवडते याचे उत्तर पुस्तक हे आहे. तिला लेखक व्हायचं आहे, असे जान्हवी म्हणते.' जूही जान्हवी बद्दल सांगते की,'जान्हवी एका अशा काळात होती तिला मॉडेल व्हायचे आहे. त्यामुळे ती उद्या असे देखील म्हणू शकते की, मला अभिनेत्री व्हायचे आहे. '   

टॅग्स :शाहरुख खानजुही चावला