'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानचे चाहते 'जवान'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. साऊथचे दिग्दर्शक एटलीचा हा सिनेमा २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता, पण आता त्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर ऑगस्टमध्ये म्हणजेच दोन महिन्यांनी प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ब्लॉकबस्टर 'पठाण' नंतर, आता चाहते शाहरुख खानच्या या वर्षी रिलीज होणाऱ्या 'जवान' या दुसऱ्या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. मात्र त्यांची प्रतीक्षा अजून थोडी लांबणार आहे. कारण एटलीचा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आता हा चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
या कारणामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णयसर्वांच्या नजरा शाहरुख खानच्या 'जवान'वर खिळल्या असताना, प्रत्येकजण त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होता, त्यामुळे ही बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. २०२२ मध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक धमाकेदार टीझर रिलीज केला होता आणि घोषणा केली होती की हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत रिलीजसाठी फारच कमी वेळ शिल्लक होता. मात्र चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू झालेले नाही. पोस्ट प्रॉडक्शनमध्ये स्पेशल सिक्वेन्सला जास्त वेळ लागतो म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, 'शाहरुख खानने या चित्रपटात काही हाय-ऑक्टेन स्टंट केले आहेत आणि ते पुढच्या पातळीवर नेले आहे. अनेक हात-हाता लढाऊ दृश्ये आहेत, ज्यात काही बारीकसारीक ट्यूनिंग आवश्यक आहे. निर्मात्यांना घाई करायची नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.