शाहरूख खानने मोडले होते सुहानाला दिलेले वचन, ९ वर्षांपूर्वी रागात लेकीने सुनावले होते अभिनेत्याला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:08 PM2021-03-30T19:08:11+5:302021-03-30T19:08:33+5:30
शाहरूख खान आपल्या मुलांच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहेत
शाहरूख खानच्या नावाचा बॉलिवूडमधील त्या सेलिब्रेटी पालकांमध्ये सामावेश होतो जे आपल्या मुलांच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहेत. इतकेच नाही तर किंग खान आपल्या मुलांना दिलेले वचन निभावतो. मात्र लेक सुहानाला शाहरूख खानने एक असे वचन दिले होते जे तो निभावू शकला नाही. ही गोष्ट थोडी जुनी आहे आणि शाहरूखला वचन मोडणे खूप महागात पडले होते. त्याला सुहानाच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते.
शाहरूख खानने रा.वन चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितले होते की, सुहानाला दिलेले वचन मोडल्यामुळे तिचा खूप ओरडा खावा लागला होता. शाहरूख खानने सुहानाला वचन दिले होते की सिगरेट पिणार नाही. मात्र सवयीमुळे त्याला ते शक्य झाले नव्हते.
या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहरूख खान म्हणाला की, मी ही गोष्ट प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सांगू इच्छितो आहे. हे खूप लज्जास्पद आहे की आपण चित्रपटात धुम्रपान करू नका असा सल्ला आणि शिकवण देतो. पण खऱ्या जीवनात याचे पालन करत नाही. पण, मला खरेच धुम्रपान सोडायचे आहे. मात्र मला त्यासाठी वेळ मिळत नाही.
शाहरूख पुढे म्हणाला की, स्मोकिंग सोडण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ हवा असतो. आज माझ्या मुलीने मला सांगितले की, पप्पा तुम्ही म्हटले होते की तुम्ही स्मोकिंग सोडणार आहात. मात्र मी सांगू इच्छितो की मी सिगरेटची संख्या कमी केली आहे. आता मी दिवसात सहा ते सात सिगरेट पितो. सिगरेटची संख्या आणखी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे.
शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो शेवटचा झिरो चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. आता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. पठाण या चित्रपटात शाहरूख दिसणार आहे.