शाहरुख खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं केलं सन्मानित, मन्नतमध्ये झाले जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 07:22 PM2022-05-07T19:22:43+5:302022-05-07T19:23:17+5:30

Shah Rukh Khan : शाहरुख खानने फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावल्यानंतर मन्नतमध्ये पार्टीचं आयोजन केले होते.

Shah Rukh Khan honored with France's highest civilian award | शाहरुख खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं केलं सन्मानित, मन्नतमध्ये झाले जंगी सेलिब्रेशन

शाहरुख खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं केलं सन्मानित, मन्नतमध्ये झाले जंगी सेलिब्रेशन

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर, अभिनेता त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठान' (Pathan Movie) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. किंग खानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची वेगळीच चर्चा आहे. दरम्यान, शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरुख खानला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी (France's highest Civilian Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे शाहरूख खानचा बंगला मन्नतमध्ये जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीमध्ये विदेशातील काही दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच या पार्टीत फ्रान्स, कॅनडा तसेच इतर देशांमधील राजदूतदेखील उपस्थित होते. 

शाहरूखच्या या सेलिब्रेशन पार्टीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये किंग खान परदेशातील पाहुण्यांचा पाहुणचार करताना दिसत आहे. या पार्टीचे फोटो कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जगभरातील प्रेक्षकांमध्ये किंग खानचे असलेले आकर्षण मला समजले. गौरी खान आणि शाहरुख खानच्या स्वागतासाठी धन्यवाद. बॉलिवूड आणि कॅनेडियन फिल्म इंडस्ट्री यांच्यातील सह-निर्मितीच्या नवीन संधी आणखी वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे.”


फ्रान्सचे भारतीय राजदूत Mr. Jean-Marc Séré-Charlet यांनी मन्नतवर झालेल्या पार्टीतील शाहरूख खानसोबतचा फोटो ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले की,फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शाहरुख खानला देणे अगदी योग्य आहे. शाहरुख तू दिलेल्या पार्टीबद्दल तुझे मनापासून आभार.

फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या शाहरुख खानच्या योगदानासाठी त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आले. ३ मे रोजी ताजमहल पॅलेस या हॉटेलमध्ये शाहरुखला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Shah Rukh Khan honored with France's highest civilian award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.