Join us

शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:58 IST

Jawan Movie : शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुख ‘जवान’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून किंग खान बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा जवान सिनेमाच्या अडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

‘जवान’ चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगमधून सिनेमाची आत्तापर्यंत तब्बल ७ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तीन दिवसांतच ‘जवान’ने अडव्हान्स बुकिंगमधून २१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरुखचा ‘जवान’ ६० ते ७० कोटींची कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुख प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी स्वत:च्याच ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड मोडणार असल्याची शक्यता आहे.

Malaika-Arjun : मलायका-अर्जुनच्या नात्यात पुन्हा दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. तर सनी देओलच्या ‘गदर २’ने ४१ कोटींची कमाई केली होती. आता किंग खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या अडव्हान बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सुपरहिट ठरलेल्या ‘पठाण’ आणि ‘गदर २’ चा रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘तारा सिंह’ची भूमिका ‘हा’ दाक्षिणात्य स्टार साकारू शकतो, ‘गदर २’च्या दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य

‘जवान’ चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसह नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. दीपिका पदुकोणही ‘जवान’मध्ये पाहुणी कलाकाराची भूमिका साकारणार आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही ‘जवान’मध्ये झळकली आहे.

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपटबॉलिवूडनयनतारा