Join us  

Shah Rukh Khan, Pathaan : “जॉन को कच्छा पहना दो, बस काम हो जाएगा...”, शाहरूख खान असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:30 AM

Shah Rukh Khan, John Abraham, Pathaan : 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याचदरम्यान शाहरूख व जॉनचा बोमान्सही पाहायला मिळाला.

‘पठाण’ने फक्त सहाच दिवसांत छप्परफाड कमाई केली. जगभरात या सिनेमाने ६०० कोटींचा आकडा पार केला आहे. भारतात ‘पठाण’ने ३०० कोटींचा टप्पा गाठला आहे. साहजिकच किंगखान जाम खुश्श आहे. अशात ‘सेलिब्रेशन तो बनता ही है...’ काल शाहरूखसह दीपिका पादूकोण, जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’च्या घवघवीत यशानिमित्त मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी शाहरूख, दीपिका, जॉन भरभरून बोलले. याचदरम्यान शाहरूख व जॉनचा बोमान्सही पाहायला मिळाला. होय, भरकार्यक्रमात शाहरूख आपल्या खुर्चीवरून उठला आणि जॉनजवळ जात, त्याने त्याच्या गालावर किस केलं. शाहरूखने किस करताच जॉन जरा लाजरा. हे पहिल्यांदा घडतंय, मी लाजतोय..., असं जॉन् हसत हसत म्हणाला. (Shah Rukh Khan Kissed John Abraham )

शाहरूखने केलं जॉनचं कौतुक...या इव्हेंटमध्ये शाहरूखने जॉनचं भरभरून कौतुक केलं. मी या चित्रपटाचा हिरो आहे, पण जॉनने साकारलेलं जिम हे कॅरेक्टर ‘पठाण’चा कणा आहे. जॉनने आपलं कॅरेक्टर अतिशय सुरेख पद्धतीने साकारलं, असं शाहरूख म्हणाला. जॉनने माझीही खूप मदत केली. मी ॲक्शनमध्ये कच्चा आहे. बाईकवर ॲक्शन देणं माझ्यासाठी कठीण होतं. मी जॉनला पाहायचो. तो तीन चार दिवस यासाठी प्रॅक्टीस करत होता. त्याला शिकायचं आहे, असं मला तेव्हा वाटलं. पण नंतर मला कळलं की, मला इजा होऊ नये म्हणून तो इतकी मेहनत करत होता. त्यामुळे मी त्याचा खूप आभारी आहे, असंही शाहरूख म्हणाला.

कच्छे पहना दो बस... ‘पठाण’मध्ये जिमच्या भूमिकेसाठी जॉनचीच निवड का केली, याचं मजेशीर कारणही शाहरूखने सांगितलं. तो म्हणाला, जॉनला पिक्चरमध्ये घेतलं की कपड्यांवरचा खर्च वाचतो. त्याला अंडरविअर घालून द्या की झालं...काम संपलं...

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाजॉन अब्राहमदीपिका पादुकोण