आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे, जमाना डिजिटलचा आहे आणि म्हणूनच बॉलिवूडचे बडे बडे स्टार्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर यायला उत्सूक आहेत. सैफ अली खाननंतर अक्षय कुमार या प्लॅटफॉर्मवर येतोय. नुकतीच अक्षयने ‘द एंड’ या त्याच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. आता किंग खान शाहरूख खान यानेही डिजिटलकडे आपला मोर्चा वळवला आहे.शाहरूख लवकरच आपला डिजिटल डेब्यू करतोय. एका थ्रीलर वेब सीरिजमध्ये शाहरूख दिसू शकतो. शाहरुखने या वेबसीरिजची कथा ऐकली नि लगेच त्यास होकार दिला. शाहरूखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिली एंटरटेनमेंट ही वेबसीरिज प्रोड्यूस करेल, असे कळतेय. तूर्तास शाहरुखच्या या वेब सीरिजबद्दल अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही. पण लवकरच याबद्दल घोषणा होणे अपेक्षित आहे.
सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:24 IST
नुकतीच अक्षयने ‘द एंड’ या त्याच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. आता किंग खान शाहरूख खान यानेही डिजिटलकडे आपला मोर्चा वळवला आहे.
सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!
ठळक मुद्देसुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. अलीकडे रिलीज झालेला त्याचा ‘झिरो’ हा सिनेमा दणकून आपटला.