Join us

'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास मनाई! शाहरुख आणि गौरीचा घरात सर्वांसाठी महत्वाचा नियम; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:21 IST

शाहरुख आणि गौरी खानने घरात फोनवर बोलण्यास सर्वांना मनाई केली आहे. काय आहे यामागील कारण (shahrukh khan)

शाहरुख खान (shahrukh khan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. गेली अनेक वर्ष शाहरुख खऱ्या अर्थाने बॉलिवूडवर राज्य करतोय. शाहरुखच्या अभिनय कारकीर्दीची जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा शाहरुखचं घर 'मन्नत'ची असते. शाहरुखचं घर 'मन्नत' खूप आलिशान आहे. शाहरुखच्या 'मन्नत'चं आकर्षण इतकं आहे की, जगभरातील शाहरुखचे चाहते 'मन्नत' बघण्यासाठी येतात. अशातच 'मन्नत'मध्ये शाहरुखने एक खास नियम केलाय. तो म्हणजे घरात फोनवर बोलण्यास बंदी आहे. काय आहे यामागील कारण?

'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास बंदी कारण...शाहरुख खानने 'मन्नत'मध्ये एक खास नियम केलाय. कुटुंबाची प्रायव्हसी लक्षात ठेऊन 'मन्नत'मध्ये शाहरुखने फोनवर वापरण्यास बंदी आहे. संपूर्ण परिवाराला एकमेकांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी शाहरुख आणि गौरीने घरी असताना कमीत कमी फोन वापरण्याचा नियम आखलाय. त्यामुळे घरात असताना शाहरुख स्वतः फोनवर बोलण्यास टाळतो. कुटुंबाच्या वैयक्तिक वेळात कोणीही बाधा होऊ नये, हा यामागे उद्देश आहे. याशिवाय मुलांनी प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि पारंपरिक मूल्य त्यांनी जपावी म्हणून 'मन्नत'मध्ये श्रीगणेश, लक्ष्मींच्या मुर्तींसोबत कुराण असलेलं दिसून येतं.शाहरुखचं वर्कफ्रंटशाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विशेष गोष्ट म्हणजे, या सिनेमात शाहरुखची लेक सुहाना खान झळकणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा सिनेमा २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी शाहरुखविषयी अशीही चर्चा होती ती म्हणजे अभिनेता 'पुष्पा २'चे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत आगामी सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडगौरी खान