Join us  

शाहरूख खानने नाकारला रजनीकांत यांचा 'थलाइवर 171', कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:10 PM

Shah Rukh Khan : 'जवान'च्या यशानंतर किंग खानला रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'थलाइवर 171' या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख(Shah Rukh Khan)ने एटली(Atlee Kumar)च्या 'जवान' (Jawan) चित्रपटातून चांगलीच खळबळ उडवून दिली. या चित्रपटात साऊथचे अनेक कलाकार दिसले. 'जवान'च्या यशानंतर किंग खानला रजनीकांत (Rajinikanth) यांचा आगामी चित्रपट 'थलाइवर 171' (Thalaivar 171) या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज (Lokesh Kanagraj) करत आहेत. नुकताच लोकेशचा 'लिओ' हा चित्रपट चर्चेत होता. वृत्तानुसार, शाहरुखने रजनीकांत स्टारर चित्रपटाची ऑफर नाकारली आहे.

लोकेश कनागराज याने 'थलाइवर 171' चित्रपटासाठी शाहरुखशी संपर्क साधला होता, पण त्याने नकार दिला कारण आता त्याला फक्त त्याच्या पात्रावर लक्ष केंद्रित करणारे चित्रपट करायचे आहेत. अलीकडेच त्याने 'टायगर 3', 'ब्रह्मास्त्र', 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'मध्ये कॅमिओ केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटांनंतर शाहरुखला आता असे चित्रपट करण्याची इच्छा नाही. होय, पण लोकेशसोबत वेगळा चित्रपट करण्यास तो पूर्णपणे तयार आहे.

शाहरुखची जागी लागली या अभिनेत्याची वर्णी मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खाने नकार दिल्यानंतर रणवीर सिंगला या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याने या भूमिकेला होकार दिला. लोकेशची योजना आहे की जर प्रेक्षकांना त्याची व्यक्तिरेखा आवडली तर तो या व्यक्तिरेखेवर 'थलाइवर 171' चा स्पिन ऑफ देखील करेल. अशा परिस्थितीत हा रणवीरसाठी फायदेशीर करार ठरू शकतो. 

लोकेशनं घेतला सोशल मीडियावरून ब्रेकअलीकडेच लोकेशने सोशल मीडियावर जाहीर केले होते की, या चित्रपटावर काम करण्यासाठी तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मोबाईल फोनवरून ब्रेक घेत आहे. या काळात तो कोणाच्याही संपर्कात राहणार नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट असेल. यामध्ये तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. रजनीकांतने स्क्रिप्ट ऐकल्यावर त्याला मिठी मारली होती.

'डंकी'साठी शाहरुख चर्चेतशाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' सध्या चर्चेत आहे. शाहरुखचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. यासह त्याने पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू आणि विकी कौशलही दिसणार आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय तो सुजॉय घोषच्या क्राईम थ्रिलर चित्रपटाचाही भाग आहे. या चित्रपटात त्यांची मुलगी सुहाना खानही दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानरजनीकांत