Join us

शाहरूख खानने शेतकरी असल्याचे सांगत अलिबागमध्ये बंगला बांधण्यासाठी खरेदी केली जमीन?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:49 AM

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात आलिशान बंगला बांधण्यासाठी गैरमार्गाने जमीन अधिग्रहीत केल्याप्रकरणी तक्रार ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात आलिशान बंगला बांधण्यासाठी गैरमार्गाने जमीन अधिग्रहीत केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार ही तक्रार मुंबई, अलिबागस्थित एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली आहे. तक्रारीत देजा वु फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ, काही अज्ञात लोक आणि शासकीय अधिकाºयांच्या नावांचा समावेश आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर आयकर विभागाने देजा वु फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन शेअरधारकांची चौकशी केली आहे. शिवाय त्यांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. त्याचबरोबर आयकर विभागाकडून याविषयीचीदेखील चौकशी केली जात आहे की, कंपनीने शाहरूख खानला दिलेली ही जमीन कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की नाही?रिपोर्टनुसार, समुद्राच्या किनाºयावर असलेला शाहरूखचा बंगला (फार्म हाउस) पाच बंगले बांधता येतील एवढ्या परिसरात बांधण्यात आला आहे. या बंगल्यात एक हेलिपॅड आणि स्विमिंग पूल आहे. शाहरूखवर असा आरोप ठेवण्यात आला की, त्याने अलिबागमध्ये शेती करण्यासाठी जमीन अधिग्रहीत केली अन् त्यावर बंगला बांधला. तक्रारकर्ते सुरेंद्र धावले यांनी ११ जानेवारी २०१७ रोजी खार पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविली आहे. यावेळी धावले यांनी मागणी केली की, शाहरूखसह याप्रकरणात असलेल्या अन्य लोकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जावा. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी याविषयी अद्यापपर्यंत तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, ज्या जमिनीवर शाहरूखचा बंगला (फार्म हाउस) बांधण्यात आले आहे, ती जमीन २००९ मध्ये शेती करण्यासाठी अधिग्रहीत केल्याची नोंद आहे. यावेळी शाहरूखवर हादेखील आरोप लावण्यात आला की, त्याने चुकीच्या पद्धतीने दावा केला की, या जमिनीवर १९९१ च्या अगोदरच बंगला बांधण्यात आला होता. नियमानुसार शेतीच्या जमिनीवर १९९१ च्या अगोदर असलेल्या बंगल्याची केवळ डागडूजी करता येऊ शकते, त्याचे नवनिर्माण करता येत नाही.शाहरूखवर हादेखील आरोप लावण्यात आला की, त्याने बंगला बांधण्यासाठी स्वत:ला शेतकरी असल्याचे सांगून जमीन खरेदी केली आहे. इंडिया रिपोर्टनुसार, शाहरूख खानने २००५-०६ मध्ये देजा वु कंपनीला ८.४ कोटी रुपये असुरक्षित कर्ज दिले होते. ही कंपनी गौरी खानच्या जवळच्या नातेवाइकांची कंपनी असल्याचे समजते. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शाहरूख खान व त्याच्या व्यवस्थापकाला पाठविण्यात आलेल्या अनेक प्रश्नांवर त्याच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.