Join us

शाहरूख खान म्हणतो, त्यासाठी मला छातीवरचे केस वाढवावे लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2017 2:54 PM

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान भलेही हॉलिवूड सिनेमांपासून स्वत:ला दूर ठेवत असला तरी हॉलिवूड स्टार्समध्ये त्याची क्रेझ नेहमीच राहिली आहे. ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान भलेही हॉलिवूड सिनेमांपासून स्वत:ला दूर ठेवत असला तरी हॉलिवूड स्टार्समध्ये त्याची क्रेझ नेहमीच राहिली आहे. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे हॉलिवूडच्या एक्स मॅन सिरीजचा प्रसिद्ध अभिनेता ह्यू जॅकमॅन याने शाहरूखविषयीचे नुकतेच केलेले वक्तव्य होय. त्याने म्हटले की, ‘द वोल्वरीन’ या भूमिकेसाठी शाहरूख हा योग्य अभिनेता आहे. मात्र जॅकमॅनच्या या वक्तव्यावर शाहरूखने काहीसे वेगळ्या अंदाजात उत्तर देताना म्हटले की, मला या भूमिकेसाठी अगोदर छातीवरील केस वाढवावे लागतील. एक्स मॅन सिरीजच्या ‘लोगान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तायवानमध्ये असलेल्या ह्यूने म्हटले होते की, ‘एक्स मॅन’ सिरीजमधील सुपरहिरोची भूमिका असलेल्या ‘द वोल्वरीन’साठी आता दुसºया अभिनेत्याचा विचार करायला हवा. एक्स मॅन सिरिजच्या तब्बल नऊ सिनेमांमध्ये जॅकमॅनने वोल्वरिनची भूमिका साकारली आहे. ‘लोगान’मध्येही तो ‘द वोल्वरीन’च्या भूमिकेत आहे. मात्र ‘लोगान’मध्ये वोल्वरीन म्हातारा दाखविण्यात आल्याने आता ही भूमिका कोणी साकारायला हवी, असे जॅकमॅनला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने लगेचच शाहरूख खान याचे नाव पुढे केले.  }}}} त्याचबरोबर ही बाब सोशल मीडियावरही वाºयासारखी पसरली. मग काय, शाहरूखच्या काही उत्साही चाहत्यांनी थेट त्याच्याकडूनच याविषयीचा खुलासा जाणून घेण्यासाठी धडपड सुरू केली. एका महिला फॅन्सने त्याला पोस्ट करीत तू या भूमिकेसाठी उत्सुक आहेस का, थेट असा सवाल केला. या पोस्टला रिट्विट करताना शाहरूखने म्हटले की, ‘या भूमिकेसाठी मला छातीवर केस वाढवावे लागतील. यावर मी काम करीत आहे. लव्ह यू ह्यू आणि वोल्वरिन’गेल्या शुक्रवारी रिलिज झालेला ‘लोगान’ वोल्वरिन सिरिजचा शेवटचा सिनेमा आहे. त्यामुळे ह्यू जॅकमन आणि वोल्वरिनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खास आहे. या सिनेमाची कथा ‘ओल्ड मॅन लोगान’ या विनोदी पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमात लोगानची शेवटची लढाई दाखविण्यात आली आहे. म्यूटंट्सची हत्त्या केली जाते आणि वोल्वरिनला त्याच्यासारखीच एक ‘एक्स २३’ नावाची मुलगी भेटते.‘लोगान’ला अमेरिकेत आर रेटिंग देण्यात आले आहे. याआधी ‘एक्स मॅन’ या सिनेमाच्या सर्वच भागांना ‘पीजी १३’ रेटिंग देण्यात आले होते. आर रेटिंगचा अर्थ आधीच्या भागांपेक्षा या भागात जास्त प्रमाणात हिंसा आणि रक्तपात दाखविण्यात आला आहे. शाहरूख आणि जॅकमॅन हे चांगले मित्र असल्याने त्याने शाहरूखचे नाव पुढे केल्याचेही बोलले जात आहे.