Pakistani Actress Sadia Khan On Dating Aryan Khan: बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. सध्या त्याच्या डेटिंगच्या अनेक अफवा समोर आल्या आहेत. नुकतंच न्यू इयर पार्टीत आर्यन खानचा एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. तर त्याआधी आर्यन खानचं नाव नोरा फतेहीशी देखील जोडलं गेलं होतं. पण आता पाकिस्तानातील अभिनेत्री सादिया खानसोबतचा आर्यनचा फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
आर्यनसोबत कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चर्चेत आली 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री; पाहा ग्लॅमरस लूक
सादिया खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आर्यन खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने दोघं डेट करत असल्याचा अंदाज लावला होता. आता स्वतः सादिया खानने यावर स्पष्टीकरण देत डेटिंगच्या चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे.
"संपूर्ण माहिती जाणून न घेता लोक माझ्या आणि आर्यनबद्दल वाटेल त्या कथा रचल्या जात आहेत हे अतिशय विचित्र आहे. बातम्यांच्या नावाखाली जे काही चाललं आहे त्यावर अंकुश लावण्याची खरंच गरज आहे", असं सादिया खाननं यूएई सिटी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
सादिया खानने खुलासा केला की ती आणि आर्यन एका न्यू इयर पार्टीत भेटले होते, जिथे दोघांची ओळख झाली आणि फोटोही क्लिक केला. सादिया म्हणाली, “एक फोटो क्लिक केला म्हणजे याचा अर्थ आम्ही डेट करतोय असा होत नाही. आर्यनसोबत फक्त मीच फोटो काढला असंही नाही. इतरही अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढले होते आणि अपलोडही केले होते. पण का कळत नाही मी एकटीच अशी आहे ज्याची इतकी चर्चा केली जात आहे"
"माझ्या आणि आर्यनबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. आर्यन गोड मुलगा आहे आणि खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे कृपया आमच्याबद्दलच्या सर्व निराधार अफवा पसरवणं थांबवा", असंही ती म्हणाली. आर्यन खान आणि तिच्यामध्ये काहीही नसल्याचं सादिया खानच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.