Join us  

शाहरुख खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? धोनीचा उल्लेख करत काय म्हणाला किंग खान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 2:49 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत शाहरुखने बॉलिवूडमध्ये असंख्य सुपरहिट सिनेमा दिले. अनेक पुरस्कार सोहळे होस्ट केले आहेत. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह कायम आहे. नुकतंच शाहरुख खानने अबूधाबीत पार पडलेल्या IIFA 2024 सोहळ्याचे होस्टिंग केले. यावेळी किंग खानने निवृत्ती घेण्याविषयी विधान केलं. 

अबूधाबीमध्ये २८ सप्टेंबरच्या रात्री IIFA 2024 पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील तारेतारका उपस्थित राहिले आहेत. IIFA Awards 2024 ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. ही एक एक अविस्मरणीय रात्र होती. या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खानने त्याच्या खास अंदाजात IIFA 2024 चं होस्टिंग केलेलं दिसलं. शाहरुखला करण जोहर आणि विकी कौशलची साथ मिळाली.

होस्ट करताना शाहरुखने मस्करीत करण जोहरला उद्देशून म्हटलं,  "महापुरुषांची सर्वात मोठी गुणवत्ता म्हणजे, त्यांना कधी थांबायचे आणि कधी निवृत्त व्हायचे, हे माहीत असते. जसे सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री आणि रॉजर फेडरर. मला वाटते की करण तुझीही आता निवृत्ती घ्यायची वेळ आली आहे".   यावर करणनेही शाहरुखला त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दल प्रश्न विचारला. 

जर असे असेल तर मग शाहरुख कधी निवृत्ती घेणार, असे करण म्हणाला. करणच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, "मी थोड्या वेगळा प्रकारचा दिग्गज आहे.  मी एमएस धोनीसारखा आहे. नाही नाही म्हणत आयपीएलचे 10 सीझन खेळून घेतो". त्यानंतर विकी कौशलने शाहरुख खानचं कौतुक करत म्हटलं, "निवृत्ती ही दिग्गजांसाठी असते, बादशाहा कायमचे असतात". दरम्यान, या IIFA Awards 2024 सोहळ्यात शाहरुख खानला  'जवान' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.  

टॅग्स :शाहरुख खानएम. एस. धोनीसेलिब्रिटीकरण जोहर