Join us  

दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:58 AM

नुकत्याच आईबाबा झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी किंग शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने चाहत्यांना गोड बातमी दिली. ८ सप्टेंबरला दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका आणि रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रणवीर-दीपिकाला कन्यारत्न झाल्याने चाहतेही आनंदी आहेत. त्यांच्या लेकीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच आईबाबा झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी किंग शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

कन्यारत्न प्राप्त झालेल्या रणवीर-दीपिकाची शाहरुखने भेट घेतली. दीपिकाला एच एन रिलायन्स या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दीपिका आणि तिच्या लेकीला भेटण्यासाठी शाहरुख खान रुग्णालयात गेला होता. रिलायन्स हॉस्पिटलबाहेरचा त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा शाहरुखने आई झालेल्या दीपिकाची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शाहरुखचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शाहरुख आधी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीदेखील दीपिका-रणवीरला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. 

काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता ते आईबाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झालं आहे. रणवीर-दीपिका आईबाबा झाल्याने चाहतेही आनंदी आहेत.  

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगशाहरुख खान