बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचे जगभरात फॅन्स आहेत. त्याच्या अॅक्टिंग, स्ट्राइलवर मुली जीव ओवाळतात. शाहरूख खान हा मूळचा दिल्लीचा आहे हे तुम्हाला माहीत असेलच. दिल्लीतील अनेक किस्से वेळोवेळी शाहरूख खास सांगत असतो. पण शाहरूख खानने नुकताच असा एक किस्सा सांगितला ज्याबाबत कधी काही ऐकायला मिळालं नव्हतं. शाहरूखने सांगितले की, दिल्लीतील काही मुलांनी त्याला मारलं होतं कारण त्याने एका मुलीला स्वत:ची गर्लफ्रेन्ड सांगितलं होतं.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खान कपिल शर्माच्या चॅट शोमध्ये सांगितलं होतं की, एकदा तो एका मुलीला डेट करत होता. त्यावेळी त्या मुलीला स्वत:ची गर्लफ्रेन्ड असल्याचं सांगितल्याने त्याला मारलं गेलं होतं. शाहरूख खानने पुढे सांगितलं की, त्यावेळी ते मारणारे मुलं म्हणाले होते की, ती मुलगी माझी गर्लफ्रेन्ड नाही तर 'वहिणी' आहे.
शाहरूख खानने या घटनेबाबत बोलताना खूलासा केला होता की, आजही तो पत्नी गौरीसोबत दिल्लीला जातो. जेव्हा कुणी गौरीबाबत विचारतं तेव्हा तो सांगतो की, गौरी त्याची वहिणी आहे. हा मजेदार किस्सा शाहरूख खानने याआधी कधीही सांगितला नव्हता. त्यामुळे त्याचे फॅन्स हा किस्सा ऐकून अवाक् झाले आहेत.
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर शाहरूख खान अखेरचा दिग्दर्शक आनंद एल रायच्या 'झीरो' सिनेमात दिसला होता. यात तो कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसला होता. शाहरूख खान आता दिग्दर्शक राजकुमार हिराणीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. पण याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
सध्या शाहरूख खान हा त्याच्या टीमच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांमध्ये बघायला मिळतो. तसेच तो त्याच्या आगामी सिनेमाचं लवकरच शूटींग सुरू करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.