Join us

Shah Rukh Khan: खरं की काय? शाहरूखला ‘फौजी’ मालिकेत मिळालं होतं झाडावरचे कावळे मोजण्याचं काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 5:30 PM

Shah Rukh Khan in Fauji : होय, ‘फौजी’मध्ये आधी शाहरूखला झाडावरचे कावळे मोजण्याचं काम देण्यात आलं होतं. पण नंतर त्याच्या वाट्याला लीड रोल आला. यामागचा किस्सा शाहरूखने एका मुलाखतीत शेअर केला होता.

Shah Rukh Khan in Fauji : गेल्या 34 वर्षांपासून शाहरूख खान (Shah Rukh Khan ) बॉलिवूड अधिराज्य गाजवत आहे. टीव्ही मालिकांमधून डेब्यू करणारा शाहरूख एकदिवस बॉलिवूडचा ‘किंगखान’ म्हणून मिरवेल, याची तेव्हा कुणी कल्पनाही केली नसावी. ‘फौजी’ (Fauji) ही शाहरूखची पहिली मालिका होती. या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अनेक जण ही मालिका पाहून शाहरूखच्या प्रेमात पडले होते. तुम्हालाही ही मालिका नक्कीच आठवत असणार? पण या मालिकेचा एक किस्सा कदाचित तुम्हालाही ठाऊक नसावा.होय, ‘फौजी’मध्ये आधी शाहरूखला झाडावरचे कावळे मोजण्याचं काम देण्यात आलं होतं. पण नंतर त्याच्या वाट्याला लीड रोल आला. यामागचा किस्सा शाहरूखने एका मुलाखतीत शेअर केला होता.

 या मुलाखतीत शाहरूखने  कर्नल राज कपूर (फौजीचे दिग्दर्शक राज कुमार कपूर) यांचे आभार मानले होते. सोबत ‘फौजी’चा एक इंटरेस्टिंग किस्साही शेअर केला होता. राज कुमार कपूर   अभिनेत्यासोबतच निर्माते आणि दिग्दर्शकही होते. कर्नल राज कुमार कपूर ‘फौजी’ बनवत असतानाच त्यांच्याशी शाहरूखची पहिली भेट झाली होती.

असा मिळाला ‘फौजी’चा रोलशाहरूखने सांगितलं होतं की, राज कुमार कपूर नसते तर कदाचित मी अभिनेता बनूच शकलो नसतो. मी त्यांचा आभारी आहे. कर्नल राज कपूर यांचे जावई तेव्हा आमच्यासाठी भाड्याचं घर शोधत होते. कारण माझ्या वडिलांचं नुकतंच निधन झालं होतं. माझी आई घर पाहायला गेली. माझा मुलगा इथे नाही, तो आला की तो बघून मग आम्ही ठरवू, असं आई त्यांना म्हणाली. यावर तुमचा मुलगा कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी केला. यावर तो अ‍ॅक्टिंगसाठी गेला आहे, असं आईने सांगितलं. यानंतर त्यांनी माझ्या आईला त्यांचे सासरे कर्नल राज कपूर यांच्याबद्दल सांगितलं. तुमच्या मुलाला माझ्या सासऱ्यांना भेटायला सांगा, ते सध्या एक मालिका दिग्दर्शित करत आहेत, असं ते आईला म्हणाले. आईच्या सांगण्यावरून मी तिथे गेलो. ‘फौजी’साठी ऑडिशन दिलं. त्यांनी मला एक चांगला रोल दिला. रोल काय तर, संपूर्ण मालिकेत मला फक्त झाडांवरचे कावळे मोजायचे होते. कर्नल मला झाडांवरचे कावळे मोजण्याची ऑर्डर देतात आणि मग मला पळत जाऊन तिथे चार कावळे आहेत, असं म्हणायचं होतं. हाच माझा रोल होता. माझ्यासाठी हे सगळंच विचित्र होतं. मी माझ्या फॅमिलीला काय सांगू, हा माझा रोल? असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता. पण पुढे सगळं माझ्या नशीबाने घडलं.

अचानक मिळाला लीड रोलकर्नल साहेबांचा मुलगा लीड रोल आणि कॅमेरा वर्क एकत्र करू शकत नव्हता. त्यामुळे अचानक मला ‘फौजी’चा लीड रोल ऑफर केला गेला. मी तो रोल स्वीकारला आणि हा शानदार रोल माझ्या वाट्याला आला. हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला, असंही शाहरूखने या मुलाखतीत सांगितलं होतं.‘फौजी’ या मालिकेनंतर 4 वर्षांनी शाहरूखला चित्रपटांत ब्रेक मिळाला. 1992 साली दीवाना, चमत्कार, राजू बन गया जेंटलमॅन, दिल आसना है असे त्याचे अनेक सिनेमे रिलीज झाले. पुढचा किंगखानचा प्रवास तुम्हाला ठाऊक आहेच.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड