बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचीमुंबईविमानतळावर तब्बल १ तास चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसह त्याची मॅनेजर पूजा दललानी हिलाही कस्टम विभागाने अनेक प्रश्न विचारले. शुक्रवारी रात्री शाहरुख त्याच्या टीमसह मुंबईविमानतळावर पोहोचला होता. त्यावेळी, कस्टम विभागाने शाहरुखसह त्याच्या टीमला चौकशीसाठी थांबवले होते. १ तासाच्या चौकशीनंतर शाहरुख आणि पूजा हे विमानतळावरुन निघून गेले. मात्र, कस्टमने शाहरुखचा बॉडीगार्ड रवि आणि टीमला थांबवून घेतले होते. शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे समोर आले आहे.
शाहरुखने लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे मुंबईला आणली आहेत. तसेच, शाहरुखच्या बॅगेत घड्याळाचे रिकामे डब्बेही दिसून आले. त्यामुळे, कस्टम ड्युटी भरली नसल्याच्या संशयावरुन विमानतळावर कस्टम विभागाने शाहरुखला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शाहरुख आपल्या प्रायव्हेट चार्टर VTR - SG ने दुबईतील एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी गेला होता. त्याच विमानाने शाहरुख शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता मुंबई विमानतळावर परतला. यावेळी, कस्टम विभागाला शाहरुख आणि त्याच्या टीमजवळ लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे दिसून आली. तसेच, घड्याळांचे रिकामे बॉक्सही दिसून आले.
कस्टम विभागाला Babun & Zurbk घड्याळ, Rolex चे 6 डब्बे Spirit ब्रँडचे घड्याळ (लगभग 8 लाख रुपये), अॅपल सीरीजचे घड्याळही सापडले. तसेच, घड्याळांचे रिकामे बॉक्सही आढळले. कस्टम विभागने या घड्याळांचे इवैल्यूएशन केले असता यावर 17 लाख 56 हज़ार 500 रुपयांची कस्टम ड्यूटी लागू होत आहे. त्यामुळे, हा टॅक्स भरण्याची सूचना कस्टम विभागाने केली. जवळपास तासभर शाहरुख़ आणि कस्टम विभागात चर्चा झाली. त्यानंतर, पूजा ददलानी व शाहरुख हे दोघेही विमानतळावरुन निघून गेले. मात्र, त्याचा बॉडीगार्ड आणि टीम तिथेच होती.
अल्लूची शाहरुख टक्कर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा द रुल' 2023च्या ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. तर, शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटही याच मुपूर्तावर चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. आजकाल बॉलिवूड चित्रपटांची काय अवस्था झाली आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. साऊथचे सिनेमे ज्या प्रकारे एकापाठोपाठ एक बंपर हिट्स देत आहेत, त्यामुळे बॉलिवूडची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानच्या 'डंकी'ची 'पुष्पा 2' सोबतची बॉक्स ऑफिस स्पर्धा चिंतेची बाब आहे.