Shah Rukh Khan : बॉलिवूड किंग शाहरूख खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'पठाण' मधील गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या लूकचं भरभरून कौतुक केलं जात आहे. आजही त्याच्या बाहू पसरवण्याच्या पोजची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. पठाणच्या दोन्ही गाण्यांमध्ये त्याची ही सिग्नेचर स्टाइल बघायला मिळते. अनेक वर्षांपासून ती फेमस आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याला ही पोज कुणी दिली किंवा याची आयडिया कुठून आली?
शाहरूख खानने त्याची हातांची सिग्नेचर स्टेप पहिल्यांदा 1993 मध्ये बाजीगर सिनेमात केली होती. बॉलिवूडच्या फेमस राहिलेल्या कोरिओग्राफर दिवंगत सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी शाहरूख खानला बाजीगर सिनेमात ही पोज करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी सिनेमाचं शूटींग मॉरिशसमध्ये सुरू होतं.
इथे एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांना किंग खानला ही स्टेप करण्यासाठी सांगितलं होतं. यात आपलं शर्ट काढून ही स्टेप करायची होती. शाहरूखने सरोज खान यांच्या सांगण्यावरून ही स्टेप केली आणि ती लोकांना खूप आवडली. त्यानंतर त्याच्या सगळ्यात सिनेमात ती वापरली गेली. ही स्टेप इतकी फेमस झाली की, त्याचे सगळेच फॅन करतात. नंतर ही स्टेप रोमान्सची ओळख झाली. आजही लोक इव्हेंट्समध्ये त्याला त्याची ही स्टेप करण्याची विनंती करतात.
पठाणमध्येही स्टेपचा जलवा
बऱ्याच वर्षानी शाहरूख खानचा पठाण (Pathaan) सिनेमा येत आहे. या सिनेमाची आणि यातील गाण्यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात शाहरूख खान, दीपिका पादुकोन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे.
पठाणसोबतच फॅन्सना शाहरूख खानच्या आणखी दोन सिनेमांची वाट आहे. त्यातील एक म्हणजे साऊथमधील दिग्दर्शक एटली (Atlee)चा जवान. ज्यात विजय सेतुपति सुद्धा असेल. तसेच तो राजकुमार हिराणीच्या डंकी सिनेमातही दिसणार आहे.