Join us

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मोठा धमाका, या OTTवर अनकट व्हर्जनमध्ये 'जवान' झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:12 IST

Shah Rukh Khan : ५८वा वाढदिवस साजरा करत शाहरुख खानने नेटफ्लिक्सवर अनकट व्हर्जनसह जवान रिलीज केला आहे.

नवी दिल्लीत जन्मलेला शाहरुख खान आज २ नोव्हेंबरला त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी, त्याने OTT प्लॅटफॉर्म Netflix वर त्याचा नवीनतम चित्रपट जवान प्रदर्शित करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. एवढेच नाही तर या खास प्रसंगी त्याने नेटफ्लिक्सवर एक मजेदार व्हिडिओही शेअर केला आहे, जो अप्रतिम आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की, हे फक्त शाहरुख खानच्या वाढदिवसालाच होऊ शकते.

काही तासांपूर्वी नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, वाढदिवस जवानचा असतो पण भेट प्रत्येकासाठी असते. आम्ही तयार आहोत. आता फक्त नेटफ्लिक्सवर जवान अनकट व्हर्जनसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान तरुणाच्या स्टाईलमध्ये म्हणतो, हॅलो नेटफ्लिक्स, गेस करो हम कहाँ हैं. नेटफ्लिक्स म्हणतो शाहरुख खान तू, यावर किंग खान म्हणतो जवानला पुढच्या दोन मिनिटांत नेटफ्लिक्सवर रिलीज करा. नाहीतर तुडुम बुडुम होईल. हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी लिहिले, शाहरुख खानकडून बर्थडे गिफ्ट. आणखी एका युजरने लिहिले, काय गिफ्ट. तिसऱ्या यूजरने लिहिले की, हे फक्त किंग खानच्या वाढदिवसालाच होऊ शकते. 

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपट