Join us  

रिलीजपूर्वीच शाहरुख खानच्या 'जवान'ने 'गदर 2' ला मागे टाकले; केली 400 कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 5:33 PM

शाहरुख खानच्या 'पठान'ने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला, आता सर्वांच्या नजरा 'जवान'वर आहेत.

किंग खान म्हणजेच शाहरुख खानसाठी 2023 सर्वाच मोठे वर्ष ठरले आहे. एका पाठोपाठ एक अपयश पाहिल्यानंतर शाहरुखने 'पठान' चित्रपटाटून दमदार कमबॅक केले. 'पठान'ने एक हजारहून अधिकची कमाई केली. आता या वर्षीच शाहरुखचा दुसरा चित्रपट 'जवान' रिलीज होणारा आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणाऱ्या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 'गदर 2' ला मागे टाकले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर आणि पश्चिम भारतातील 'जवान'चे थिएटरचे राइट्स 150 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. याशिवाय, OTT आणि म्युझिक राइट्स विकून जवानने 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच, ओटीटी आणि थिएटर राइट्स विकून निर्मात्यांच्या खिशात 400 कोटी रुपये आले आहेत. 

सनी देओलच्या 'गदर 2' प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत(9 दिवसांत) 336 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची कमाई अजूनही सुरू असून, चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. अद्याप या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेलेले नाहीत. पण, शाहरुखच्या 'जवान'ने रिलीजपूर्वीच 'गदर 2' च्या आतापर्यंच्या कमाईला मागे टाकले आहे.

शाहरुखचा सर्वात मोठा चित्रपट'जवान' हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये आहे. याआधी शाहरुखच्या एकाही चित्रपटावर इतका पैसा खर्च झालेला नाही. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा 'पठान' चित्रपटाचे बजेट सुमारे 225 कोटी होते. आतापर्यंत 'जवान'चे टीझर, दोन गाणी आणि प्रिव्ह्यू व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर अजून यायचा आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत असून, दीपिका पदुकोणचीही छोटी भूमिका आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसनी देओलबॉलिवूड