Join us

ॲक्शन, ड्रामा, थरार... अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:16 IST

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. किंग खानने स्वतः 'जवान'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 'जवान'च्या 2 मिनिटे 47 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये चाहत्यांना ॲक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळत आहे. ट्रेलरची सुरुवात शाहरुखच्या शानदार डायलॉग्सने होते. यानंतर तो अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. ट्रेलरनेच मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते वाट पाहत आहेत. 

चेन्नईमध्ये ‘जवान’ सिनेमाचं म्यझिक लॉन्च सोहळा पार पडला आहे. पण त्याआधी किंग खान जम्मूच्या कटरा येथील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. वैष्णोदेवीच्या दरबारात जाऊन चित्रपटासाठी आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचं दिग्दर्शन अटली कुमारने केलं आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपथी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘जवान’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसिनेमा