Join us

Shahrukh Khan: बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 11:52 AM

शाहरुखची मर्सिडीज बेंझ एस क्लास मुंबईतील रस्त्यावरून उचलण्यात आली आहे.

बॉलिवूडचा बादशहा किंगखान शाहरुख खानचा आज वाढदिवस. शाहरुखचा वाढदिवस म्हटल्यानंतर ‘मन्नत’बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी जमणार हे सांगायला ज्योतिषाची गर नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले. शाहरुखवर एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत असून दुसरीकडे नेमकं वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर शाहरुखची मर्सिडीज बेंज कार टो करुन नेण्यात आल्याने नेटीझन्स ट्विटवर त्याची मजाही घेत आहेत. 

शाहरुखची मर्सिडीज बेंझ एस क्लास मुंबईतील रस्त्यावरून उचलण्यात आली आहे. त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीची किंमत जवळपास १ कोटी ५९ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे शाहरुखकडची ही सर्वात कमी किंमत असलेली गाडी आहे. यावरून शाहरुखची जीवनशैली कशी असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. या गाडीतही तो अनेकदा चाहत्यांना दिसला आहे. मात्र, वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्याची मर्सिडीज कार टोईंग करुन उचलण्यात आल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे. 

शाहरुखची गाडी नेमकी कोणत्या कारणामुळो टो करण्यात आली हे खात्रीशीर समजू शकले नाही. मात्र, गाडी खराब झालेली असू शकते किंवा पार्किंग चुकीच्या ठिकाणी केलेली असू शकते. पण, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर मजा घेतली आहे. अनेकांनी आपल्या विनोदी डोक्यातून भन्नाट मिम्सटाईप कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, गाडीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा फोटो नंबरप्लेवरट दिसत आहे. त्यामुळे, काहींनी ही नंबरप्लेट अशोक गेहलोत यांची असल्याचेही म्हटलंय. 

चाहत्यांची गर्दी, शाहरुखने घेतला सेल्फी

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर अक्षरश: दिवाळी साजरी केली. फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह बाल्कनीत आला आणि त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केलं. चाहत्यांचं प्रेम पाहून शाहरूख भारावून गेला. छोटा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी एसआरकेने आपल्या मोबाईलमधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली. 

टॅग्स :बॉलिवूडमुंबईशाहरुख खानवाहतूक कोंडी