शाहिद कपूर घेतोय 6 प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 04:13 AM2017-08-12T04:13:16+5:302017-08-15T19:48:22+5:30

शाहिद कपूर त्याच्या चित्रपटातील भूमिकेबाबत नेहमीच परफेक्ट असतो. मग जब वी मेट मधील हिरो असो किंवा उडता पंजाबमधला रॉकस्टार ...

Shaheed Kapoor is training 6 types of sword! | शाहिद कपूर घेतोय 6 प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण!

शाहिद कपूर घेतोय 6 प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण!

googlenewsNext
हिद कपूर त्याच्या चित्रपटातील भूमिकेबाबत नेहमीच परफेक्ट असतो. मग जब वी मेट मधील हिरो असो किंवा उडता पंजाबमधला रॉकस्टार त्यांने आपली प्रत्येक व्यक्तीरेखा चोखपण निभवली आहे. सध्या तो संजय लीला भंन्साली यांच्या पद्मावती चित्रपटासाठी तयारी करतोय. या चित्रपटात तो राणी पद्मावतीच्या पतीच्या म्हणजेच चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत दिसणार आहे.  या भूमिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेताना दिसतो आहे. गेल्या एक महिन्यांपासून तो 6 प्रकारच्या तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतो आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार तो दक्षिण भारतातील प्रसिद्ध तलवार बाजी कलरीपायट्टू आणि अंगमपोरा यांचे मिश्रण शिकत आहे. त्याचबरोबर राजपूतांचे एक विशिष्ट हत्यार आहे ते चालवण्यचे प्रशिक्षणसुद्धा तो घेत आहे. हे सगळ करताना तो आपल्या डाएटकडे सुद्धा खास लक्ष देतो आहे. पद्मावती नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे शाहिदला तो पर्यंत शूटिंग आणि ट्रेनिंग अशा दोन्ही गोष्टी संभाळाच्या आहेत. 

ALSO READ :  शाहिद कपूरची ‘पद्मावती’ सेल्फी झाली व्हायरल; वाचा सविस्तर !

संजय भन्साली दिग्दर्शित या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारणार आहे तर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. सध्या शाहिद कपूर मुलगी मिशाच्या पहिल्या  वाढदिवसासाठी लंडनाला रवाना झाला आहे. 26 ऑगस्टला शाहिदची मुलगी मिशा एक वर्षांची होणार आहे. तिचा पहिला वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी शाहिद त्याची पत्नी मीरा राजपूत आणि मिशासोबत लंडनाला गेला आहे. सध्या शाहिद पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे  तरीही त्यांने आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढला आहे. शाहिद चित्रपटासाठी घेत असलेली मेहनत किती फळास येते हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.  

Web Title: Shaheed Kapoor is training 6 types of sword!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.