अभिनेता शाहिद कपूरला 2019 हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरलं. त्याच्या 'कबीर सिंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. काही दिवसांपूर्वी शाहिद चंडीगढमध्ये त्याचा आगामी सिनेमा 'जर्सी'चे शूटिंग करत होता. याच दरम्यान तापमान कमी झाल्यामुळे अचानक ठंडी खूप वाढली. मात्र अशा परिस्थितही शाहिद कपूरने शूटिंग कुठेच थांबवले नाही. त्याने शूटिंग पूर्ण केले.
डिसेंबरमध्ये चंडीगढमध्ये सर्वाधिक ठंडी असते. याच महिन्यात शाहिद तिकडे नॉन स्टॉप शूटिंग करत होता. दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी शाहिदचे कौतूक करताना म्हणाले, ''शाहिद खूपच प्रोफेशनल अभिनेता आहे. डिसेंबरमध्ये आम्ही आऊटडोर शूटिंग करत असताना थंडीमुळे आम्ही 3 ते 4 कपडे घालायचो. मात्र अशा कडक्याच्या थंडीतही शाहिदने 100 टक्के देऊन शूटिंग केले.''
निर्माते अमन गिल म्हणाले, रात्रीचा तर पारा 2 डिग्रीच्या जवळपास जायचा. मात्र तरीही शाहिद खूप फोकस होता. त्याने स्वता:वर किंवा सिनेमाच्या क्रू मेंबर्स पैकी कोणावर थंडीचा परिणाम होऊ दिला नाही. एक प्रोफेशनल अभिनेता म्हणून त्याला शूटिंग वेळेत पूर्ण करायचे महत्त्व माहिती होते आणि त्याने तसेच केले.
‘जर्सी’ हा सिनेमा साऊथचा रिमेक आहे. ‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत.शाहिदचे वडील पंकज कपूरही यात कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आता हाच संघर्ष शाहिद कपूर पडद्यावर जिवंत करणार आहे. शाहिदचा हा सिनेमा 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.