Join us

जब वी मेट! शाहीद-करीनाला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश; म्हणाले, "दोघं एकत्र असते तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:41 IST

नुकतंच धीरुभाई अंबानी शाळेत झालेल्या गॅदरिंगमध्ये शाहीद-करीना एकाच फ्रेममध्ये दिसले.  

शाहीद-करिनाचा (Shahid Kapoor-Kareena Kapoor) 'जब वी मेट' (Jab We Met) हा सर्वांचाच ऑल टाईम फेवरिट सिनेमा. या सिनेमाने करीनाला गीत ही भूमिका दिली जी प्रचंड लोकप्रिय ठरली. तर शाहीदही आदित्य च्या भूमिकेत उठून दिसला. सिनेमाची गोष्ट, डायलॉग्स, गाणी सगळंच मनाला भिडणारं होतं. तसंच हा सिनेमा करीना-शाहीदच्या ब्रेकअपनंतर आला होता त्यामुळे याकडे बघण्याचा चाहत्यांचा दृष्टिकोनही तसा होता. आजही करीना शाहीद एकत्र दिसले की चाहत्यांना 'जब वी मेट'ची आठवण येते. नुकतंच धीरुभाई अंबानी शाळेत झालेल्या गॅदरिंगमध्ये शाहीद-करीना एकाच फ्रेममध्ये दिसले.  

अंबानी स्कूलमध्ये काल अॅन्युअल फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या, शाहरुख खानचा मुलगा अबराम, करीना-सैफची मुलं तैमुर आणि जेह तसंच शाहीद कपूरची मुलगी मिशा याच शाळेत शिकत आहे. मुलांच्या गॅदरिंगसाठी या सर्वच स्टार्सने काल हजेरी लावली. त्यामुळे अंबानी स्कूलमध्ये बॉलिवूडच अवतरलं. अमिताभ बच्चनही स्वत: नातीसाठी हजर होते. दरम्यान एका व्हायरल फोटोमध्ये शाहीद-करीना कपूर एकाच फ्रेममध्ये दिसले. करीनाच्या मागेच शाहीद कपूर बसला होता. या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश झालेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने हे फोटो पोस्ट केले आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिले, 'गीत-आदित्य', 'हा फोटो खूप व्हायरल होणार, यार हे दोघं आजही एकत्र किती छान दिसतात', 'गीत-आदित्य आपापल्या मुलांचा परफॉर्मन्स बघताना, 'हे दोघं सोबत असते तर बरं झालं असतं, क्युट कपल आहे', 'लग्न त्याचंही झालं, हिचंही झालं पण दोघांचं एकमेकांशी झालं असतं तर काही औरच होतं'. नेटकऱ्यांच्या कमेंट्समुळे चाहत्यांचं आजही या जोडीवर किती प्रेम आहे हे  लक्षात येतं.

टॅग्स :शाहिद कपूरकरिना कपूरबॉलिवूडमुंबई