Join us

शाहिद कपूर-करीनाची गळाभेट, बऱ्याच वर्षांनंतर रंगल्या गप्पा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:58 IST

शाहिद-करीनाला एकत्र पाहून चाहतेही खूश

बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेम प्रकरणांपैकी एक म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूरचं (Kareena Kapoor) अफेअर. एक काळ होता जेव्हा दोघं एकमेकांच्या आकंट प्रेमात बुडाले होते. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडायची. 'कॉफी विद करण'मध्ये तर करीनाने तर शाहिदवरचं प्रेम खुलेपणाने मान्य केलं होतं.  मात्र काही वर्षांनंतर त्यांचं अचानक ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपचीही चर्चाही झाली. आता बऱ्याच वर्षांनी शाहिद-करीनाने चक्क गळाभेट घेत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. 

शाहिद कपूर आणि करीना कपूर दोघंही आपापल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. आपापल्या संसारात रमले आहेत. याआधीही अनेकदा दोघं समोरासमोर आले. त्यांनी 'उडता पंजाब' हा सिनेमाही केला होता. त्यांचे एकमेकांसोबत सीन नव्हते मात्र त्यांनी एकत्रच प्रमोशन केलं होतं. कितीदाही समोर आले तरी दोघं केवळ एकमेकांकडे बघून हसायचे. पण आता चक्क दोघांनी गळाभेट घेतली आहे. नुकतंच आयफा पुरस्कार सोहळ्याआधीची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी शाहिद-करीना समोर आले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. नंतर मनसोक्त गप्पाही मारल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शाहिद-करीनाचा सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे 'जब वी मेट!'. आजही त्यांना गीत आणि आदित्य नावानेच हाक मारली जाते. या व्हिडिओच्या कमेंट्समध्येही सर्वांनी गीत-आदित्य एकत्र आले म्हणत कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ब्रेकअपनंतर 'जब वी मेट' सिनेमा केला होता. त्यांना पुन्हा पडद्यावर एकत्र बघण्याची चाहत्यांची इच्छा आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरकरिना कपूरबॉलिवूडव्हायरल व्हिडिओ