Join us

शाहिद कपूर व श्रद्धा कपूरचा 'हार्ड हार्ड' डान्स ह्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 19:32 IST

'पद्मावत'नंतर शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीलाशाहिद कपूर, श्रद्धा कपूर व यामी गौतम मुख्य भूमिकेत

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूरचा बहुचर्चित 'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. येत्या २१ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील गाणी सध्या चांगलीच गाजत आहेत. या चित्रपटातील तीन गाणी रिलीज झाली असून नुकतेच 'हार्ड हार्ड' हे तिसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावर शाहिद व श्रद्धा एकत्र थिरकताना दिसत आहेत.

नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी 'हार्ड हार्ड' हे गाणे दिग्दर्शित केले आहे. शाहिद कपूरचा नृत्याविष्कार बघणे ही त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. या गाण्यातील अभिनयाने शाहिदने नक्कीच चाहत्यांची दाद मिळवली. गीतकार सिद्धार्थ-गरिमा यांनी रचलेले हार्ड हार्ड हे गाणे मिका सिंगने गायले आहे. सचित टंडन व प्रकृती कक्कर यांनीही आवाज दिला असून अभिजीत वघनानी यांनी ते संगीतबध्द केले आहे.

याआधीची गाणीसुद्धा चाहत्यांनी डोक्यावर घेतली होती. ही तिन्ही गाणी प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करतील असा अंदाज आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, श्रद्धा कपूर व यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.  'पद्मावत'नंतर शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा पाहायला मिळणार आहे.   

टॅग्स :शाहिद कपूरश्रद्धा कपूर