शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. शाहिदने आजवर विविध सिनेमांमधून त्याचं स्वतःचं फॅन फॉलोईंग निर्माण केलंय. कधी शाहिद 'जब वी मेट' मधून रोमँटिक हिरो म्हणून समोर आला तर कधी 'आर. राजकुमार' मधून त्याने तगडी अॅक्शन केलेली दिसली. शाहिदचा 'तेरी बातो में उलझा जिया' हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर सर्वांना आवडतोय. या सिनेमाच्या निमित्ताने शाहिद कपूरने एका मुलाखतीत तो कोणत्या अध्यात्मिक गुरुंना फॉलो करतो, त्यांचं नाव सांगितलंय.
क्विंटला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपूरने खुलासा केलाय. म्हणाला, "हा माझा अध्यात्मिक मार्ग आहे. मला नेहमीच जीवनाबद्दल खूप उत्सुकता होती. मी माझ्या संघर्षाच्या काळात कुठेतरी हरवलो होतो. कारण माझ्याकडे काही प्रश्नांची उत्तरं नव्हती अन् मला काहीच कळत नव्हते. त्यामुळे मी राधा सोमी यांच्या मार्गाचा अवलंब करतो. मी खरोखरच त्यांच्या विचारांशी जोडला गेलोय."
शाहिद या मुलाखतीत पुढे म्हणाला, "राधा सोमींच्या मार्गामुळे मला प्रत्येक गोष्टींचा अर्थ उलगडण्यास मदत झाली. मला वाटते की, यामुळे मला गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत झाली. एक अभिनेता, एक बाबा आणि मुलगा या नात्याने मी खरंतर माझं परमेश्वरासोबतचं नातं शोधण्यासाठी जास्त उत्सुक आहे,” शाहिद पुढे म्हणाला. शाहिद आणि क्रिती सेनॉन यांच्या रोमँटिक कॉमेडी, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.