शाहिद कपूरने दिली आतली बातमी; मीराला लगेच हवे दुसरे मुल !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 07:07 AM2017-02-10T07:07:24+5:302017-02-10T12:37:24+5:30
शाहिद कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, त्याची लाडकी लेक मीशा. शाहिदने लाडक्या मीशाचा पहिला फोटो ...
श हिद कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, त्याची लाडकी लेक मीशा. शाहिदने लाडक्या मीशाचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मीशाचा हा गोंडस फोटो पाहून कुणाच्याही तोंडून ‘व्वा’ असेच शब्द बाहेर पडतील. खरे तर शाहिद इतक्यात मीशाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करेल, असे वाटले नव्हते. कारण अलीकडे एका इव्हेंटमध्ये शाहिद मीशाचा फोटो शेअर करण्याबद्दल दुसरेच काही बोलला होता. मीशाचा फोटो आम्हाला कधी दाखवशील? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर, मी मीशाच्या पहिल्या वाढदिवसाला तिचा फोटो शेअर करेल, असे शाहिद म्हणाला होता. पण शाहिदने मीशाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच तिचा फोटो शेअर केला. आता यामागचे कारण आम्हालाही माहित नाही. पण एक गोष्ट मात्र आम्हाला माहित झाली आहे. होय, शाहिद व त्याची पत्नी मीरा दुस-या बाळाचा विचार करत आहेत.
ALSO READ : शाहिद कपूरने शेअर केला मुलगी ‘मीशा’चा फर्स्ट फोटो
बेडवर जाण्यापूर्वी मीराला काय म्हणतो शाहीद?
गतवर्षी आॅगस्टमध्ये शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिने मीशाला जन्म दिला होता. पण आता मीराला म्हणे, दुस-या मुलाची घाई झाली आहे. मीरा केवळ २२ वर्षांची आहे. पण मीशानंतर तिला लगेच दुसरे मुल हवे आहे. आता तुम्ही म्हणाल हे, आम्हाला कसे ठाऊक? तर स्वत: शाहिदनेच ही गोष्ट जगापुढे जाहिर केली. मीरा दुसºया बाळासाठी उतावीळ झाली आहे. एका विशिष्ट वयापर्यंत दोन मुलं व्हावी. यानंतर जे काही करायचे, त्यासाठी मी मोकळी, असा विचार मीरा सध्या करतेय,असे शाहिदने सांगितले. आता मीशा दुसºया मुलासाठी उतावीळ झाली म्हटल्यावर शाहिदलाही तयारी करावीच लागणार. सो,यासाठी शाहिदला शुभेच्छा देऊ यात. लगे रहो, शाहिद कपूर!