शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' सिनेमा या व्हॅलेंटाईनच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. यामध्ये क्रिती रोबोट आहे तर शाहीद रोबोटच्याच प्रेमात पडतो अशी मजेशीर कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी तर चाहत्यांना आवडले आहेत. शिवाय शाहीद आणि क्रितीचे अनेक किसींग सीन्सही आहेत. दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार सेंसर बोर्डाने शाहीद क्रितीच्या 25 टक्के इंटिमेट सीन्सवर कात्री मारली आहे.
शाहीद आणि क्रितीच्या रोमकॉम सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. तसंच ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच पडद्यावर बघायला मिळणार आहे. गाणी, डान्स, रोमान्स, इमोशन्स असा सगळाच मसाला यामध्ये आहे. माध्यम रिपोर्टनुसार, सिनेमातील काही सीन्सवर सेंसर बोर्डाने कात्री मारली आहे. सिनेमा ३६ सेकंदाचा इंटिमेट सीन आहे. तो सीन बोर्डाने 9 सेकंदांनी कमी करायला सांगितला आहे. त्यामुळे आता २७ सेकंदाचा सीन राहिला आहे.'
यासोबतच सिनेमातील काही डायलॉग्समध्येही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'दारु' या शब्दाच्या जागी 'ड्रिंक' करण्यास सांगितलं आहे. तसंच सिनेमातील धुम्रपानाच्या सीन्सवेळी हिंदीमध्ये मोठ्या अक्षरात धुम्रपान आरोग्यासाठी धोकादायक असल्याची सूचना लिहिण्यास सांगितली आहे. CBFC कडून सिनेमाला U/A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. २ फेब्रुवारीलाच सिनेमा बोर्डाकडून पास करण्यात आला आहे. सिनेमाची एकूण वेळ 143 मिनिटे 15 सेकंद आहे. १६ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.