शाहिद कपूर आजारी, शूटींग अर्धवट सोडून मुंबईत परतला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 6:47 AM
सध्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या प्रकृतीच्या बातम्या कानावर येत आहेत. याच महिन्यात इरफान खानच्या आजारपणाची धक्कादायक बातमी आली. न्यूरो एंडोक्राईन ...
सध्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या प्रकृतीच्या बातम्या कानावर येत आहेत. याच महिन्यात इरफान खानच्या आजारपणाची धक्कादायक बातमी आली. न्यूरो एंडोक्राईन ट्युमर नामक दुर्धर आजाराने इरफानला गाठल्याचे कळताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पाठोपाठ महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. जोधपूर येथे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे शूटींग सुरु असताना अचानक बिग बींची आजारी पडल्याची बातमी आली. यानंतर लगेच मुंबईच्या डॉक्टरांची एक टीम जोधपूरला रवाना झाली. इरफान आणि अमिताभ यांच्यानंतर आता शाहिद कपूर याची प्रकृतीही बिघडल्याची बातमी आहे. यामुळे शाहिदला शूटींग अर्धवट टाकून मुंबईला परतावे लागलेयं.सध्या उत्तराखंडमध्ये ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचे शूटींग सुुरू आहे. शाहिद कपूर यात मुख्य भूमिकेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बत्ती गुल मीटर चालू’चे शूटींग सुरू असताना मंगळवारी शाहिदची प्रकृती अचानक बिघडली. सर्दी आणि फ्लूमुळे शाहिदला संवाद बोलणेही कठीण झाले. अखेर शूट रद्द करण्यात आले. बुधवारी सकाळी शूट पुन्हा सुरु झाले पण शाहिदची प्रकृती आणखीच बिघडली. अखेर त्याने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चित्रपटाचे शूट लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळतेय. या चित्रपटात शाहिद वकीलाच्या भूमिकेत आहे. अशात त्याच्या वाट्याला चित्रपटात बरेच संवाद आहे. सतत संवाद म्हणून म्हणून शाहिदच्या वोकल कॉर्डवर सूज आल्याचीही माहिती आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शाहिद लवकरच बरा होईल आणि सेटवर परतेल, अशी अपेक्षा करूयात.ALSO READ : म्हणून ‘पद्मावत’चे शूटींग पूर्ण होईपर्यंत हॉटेलमध्ये राहिला शाहिद कपूर! ‘बत्ती गुल मीटर चालू’मध्ये श्रद्धा कपूर शाहिद कपूरच्या अपोझिट आहे. श्रीनारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट यावर्षी ३१ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या चित्रपटाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या चित्रपटासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. या चित्रपटात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. या चित्रपटात श्रद्धाची भूमिकाही शाहिद कपूरच्याच तोडीची असल्याचे कळतेय. श्रद्धा यात एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे.