Join us

Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:37 IST

Shahid Kapoor : शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

शाहिद कपूर (Shahid Kapoor ) व मीरा राजपूत (Mira Rajput) ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. म्हणायला, मीराचा बॉलिवूड इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. पण शाहिदशी लग्न झाल्यावर ती सुद्धा सेलिब्रिटी झाली आहे. इंडस्ट्रीतील ग्लॅमरच्या झगमगाटात ती सुद्धा रूळली आहे. शाहिदची बायको या नात्याने त्याचं स्टारडम ती अगदी लिलया सांभाळते. बॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये शाहिदसोबत पोझ देणं असो वा शोमध्ये त्याच्यासोबत मुलाखती देणं असो, तिला सगळं उत्तम जमतं. शिवाय दोन मुलांची आई असलेली मीरा घराची, कुटुंबाचीही तितकीच उत्तम काळजी घेते. अशा बायकोच्या प्रेमात कोण पडणार नाही? होय, शाहिदचंच बघा. शाहिद पुन्हा एकदा मीराच्या प्रेमात पडला आहे. विश्वास बसत नसेल तर त्याची इन्स्टा पोस्ट तुम्ही बघायलाच हवी.शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मीरासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

होय, या कॅप्शनमध्ये त्याने  बायकोलाच पुन्हा एकदा लग्नासाठी प्रपोज केलं आहे.  ‘मुझसे शादी करोगी मीरा कपूर?,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याचा हा फोटो आणि कॅप्शन सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी  अलिकडेच प्रसिद्ध डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या  लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नातला हा फोटो आहे. फोटोत  दोघंही पारंपरिक पण स्टाईलिश पेहरावात दिसले.  

काही दिवसांपूर्वी शाहिदने ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्याने  बायको मीराचं कोण कौतुक केलं होतं.  ाीरा आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं असल्याचं तो म्हणाला होता.  शाहिदने 2015 मध्ये मीरासोबत लग्नगाठ बांधली. 26 आॅगस्ट 2016 रोजी या दोघांना पहिलं कन्यारत्न झालं. तिचं नाव मिशा.  यानंतर 5 सप्टेंबर 2018 रोजी त्यांचा मुलगा झैन कपूरचा जन्म झाला.  

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूतबॉलिवूड