Shahid Kapoor : नवीन वर्षाचे स्वागत करुन सेलिब्रिटी मुंबईत परतत आहेत. अनेक जण कुटुंबासोबत मुंबईविमानतळावर दिसत आहेत. नुकताच अभिनेता शाहीद कपूर पत्नी मीरा कपूरसह मुंबई विमानतळावर दिसला. शाहीदला बघताच चाहत्यांनी गराडा घातला. पण असं काय झालं की शाहीद अचानक फोटोग्राफर्सवर भडकला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
बॉलिवुडचा कबीर सिंग शाहीद कपूर विमानतळावर येताच चाहत्यांनी फोटोसाठी गर्दी केली. आधी शाहीदने कॅमेऱ्यासमोर पोझ दिली, चाहत्यांसोबत फोटोही काढले. यानंतर तो गाडीत बसला. मात्र फोटोग्राफर्सने त्याला तिथेही एकटे सोडले नाही. हे बघून शाहीद चिडला, व्हिडिओ का घेताय ?' असे त्याने चिडून विचारले. इतका वेळ शांत असलेला शाहीद अचानक का चिडला असा प्रश्न फोटोग्राफर्सलाही पडला.
शाहीदच्या या वागण्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. फारच अॅटिट्युड आला का असा म्हणत शाहीदला ट्रोल करायला सुरुवात झाली. शाहीदचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुम्ही भाव देता म्हणूनच हे लोक नखरे करतात अशी कमेंट करत युझर्सने बॉलिवुड कलाकारांवरच निशाणा साधला. याउलट काही युझर्सने फोटोग्राफर्सलाच सुनावले. त्याने एकदा पोझ दिली ना मग आता त्याला कशाला अजून व्हिडिओ हवाय अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने केली आहे.