असे अनेक चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेले. परंतु त्याच चित्रपटांनी ओटीटीवर येताच धुमाकूळ घातला. सध्या असाच एक चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. परंतु ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट खूप लोकांनी पाहिला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या अपयशी ठरलेला सुपरस्टार शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'देवा' (Deva) नेटफ्लिक्सवर (Netflix) कमाल करत आहे. सध्या, हा चित्रपट संपूर्ण भारतात नेटफ्लिक्सवर नंबर १ ट्रेंडिंग चित्रपट बनला आहे. अर्थात, 'देवा'ला थिएटरमध्ये प्रेक्षक मिळाले नाहीत, पण ओटीटीवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
देवा हा चित्रपट ३१ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. शाहिदचा हा चित्रपट कमाईच्या बाबतीत हिट ठरेल असं मानलं जात होतं. पण तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. सिनेमानं फक्त ३२ कोटी कलेक्शन केलं. खरंतर 'देवा' हा अभिनेता आणि दिग्दर्शक रोशन अँड्र्यूजच्या 'मुंबई पोलिस' या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. पण, मुंबई पोलिस'नं मिळवलेल्या यशाच्या निम्मे यशही देवाला मिळवता आले नाही. पण, अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा चित्रपट पाहात असल्यानं निर्मात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.