२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगून’ या चित्रपटात शाहिद कपूर व कंगना राणौतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट कंगना व शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा होता. पण या चित्रपटातील एक किसींग सीन चांगलाच गाजला होता. या सीनमध्ये दोघेही चिखलाने माखलेले होते.हा सीन पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, शाहिद कपूरची ताजी मुलाखत. होय, अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये शाहिद या सीनवर बोलला. ‘रंगून’मधील या सीनमधील सर्वात खराब भाग कोणता होता? असा प्रश्न नेहाने शाहिदला केला. यावर शाहिदने जे उत्तर दिले ते ऐकून नेहा सुद्धा अवाक् झाली.
‘त्या सीनबद्दल मला काहीही आठवत नाहीये. मी ब्लँक झालोय. चिखलातील सीन होता, त्यामुळे keechad-y होता,’ असे उत्तर शाहिदने दिले.तुम्हाला ठाऊक आहेच की, शाहिद व कंगनामधील संबंध फार काही चांगले नाहीत. यापूर्वी एका मुलाखतीत कंगनाही या किसींग सीनबद्दल असेच काही बोलली होती. ‘रंगून’च्या सेटवर शाहिदसोबत एकच कॉटेज शेअर करणे एका वाईट स्वप्नासारखे होते. त्याच्यासोबतचा किसींग सीन चित्रीत करणे तर अतिशय घाणेरडे होते, असे कंगना म्हणाली होती. तेव्हापासून कंगना व शाहिद यांच्यात ३६ चा आकडा आहे.