Join us

ऑफर झालेली 'रंग दे बसंती' मधली 'ही' भूमिका, स्क्रिप्ट आवडूनही का सोडला शाहिद कपूरने सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 18:19 IST

शाहिद कपूरने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 'रंग दे बसंती' सिनेमाविषयी मोठा खुलासा केलाय (Rang De Basanti, Shahid Kapoor)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहीदची 'फर्जी' ही वेबसिरीज चांगलीच गाजली. याशिवाय नुकताच रिलीज झालेला 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमाही लोकप्रिय ठरला. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत शाहिदने अनेक चित्रपट केले. काही चित्रपटांची ऑफर त्याने नाकारली. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'रंग दे बसंती'. शाहीदने याविषयी सविस्तर खुलासा केलाय. 

देशभक्तीपर थीम आणि कथा असलेला 'रंग दे बसंती' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा. शाहिदने नेहा धुपियाच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, त्याला या चित्रपटाची ऑफर नाकारावी लागली. त्याला चित्रपटातील करण सिंघानियाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. जी नंतर सिद्धार्थने केली. तारखा जुळत नसल्याने शाहिदला 'रंग दे बसंती' सिनेमात काम करता आले नाही. 

शाहिद म्हणाला, "मी तो चित्रपट करू शकलो नाही याचे मला खूप दुःख आहे. राकेशजींची इच्छा होती की मी सिद्धार्थची भूमिका साकारावी. मी जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा रडलो होतो. मला कथा खूप आवडलेली. पण मला त्या चित्रपटासाठी वेळ मिळू शकला नाही." तुम्हाला ठाऊक असेल 'रंग दे बसंती'मध्ये सिद्धार्थने करण सिंघानियाची भूमिका साकारली होती, जो एका श्रीमंत बापाचा मुलगा आहे. पण त्याचे वडिलांशी संबंध चांगले नाहीत. या चित्रपटातून सिद्धार्थने हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केले. 

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूड