Join us

शाहिद कपूर झळकणार ह्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:31 PM

मेरी कोम, महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिकनंतर आता बॉक्सिंगपटू डिंको सिंग यांच्या बायोपिकची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देडिंको सिंगची भूमिका करणार शाहिद कपूर डिंकोंची कथा खूप मनोरंजक आणि प्रेरणादायी -शाहिद कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आला असून खेळाडूंवरील बायोपिकच्या संख्येत वाढ झाली आहे. मेरी कोम, महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिकनंतर आता बॉक्सिंगपटू डिंको सिंग यांच्या बायोपिक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिंको सिंगची भूमिका अभिनेता शाहिद कपूर करणार आहे.

मुळचे मणिपूरचे असणारे डिंको सिंग यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यांना २०१३ साली पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. त्यानंतर डिंको सिंग तरूण बॉक्सर्सना प्रशिक्षण देऊ लागले. २०१७ साली डिंको यांना कर्करोग झाला आणि त्यांना उपचारासाठी निधी जमवताना खूप त्रास झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन एअरलिफ्ट व शेफ चित्रपटाचे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन करणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला एप्रिल २०१९मध्ये सुरूवात होणार आहे. या चित्रपटाबद्दल शाहिद म्हणाला की, या कथेतील सर्वात चांगली बाब ही आहे की यात अशा स्टारची कथा सांगितली आहे ज्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही. जर दंगलसारखा सिनेमा बनला नसता तर आपल्याला फोगट बहिणींबद्दल माहित झालेच नसते. डिंकोला कर्करोग झाला होता. त्यांनी तेरा किमोथेरपी घेतली. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते.

 

२०१७ साली जेव्हा डिंकोला कँसर झाल्याचे समजले तेव्हा गौतम गंभीरने त्यांना उपचारासाठी मदत केली होती. त्यानंतर तेरा डॉक्टर उपचारासाठी आले होते. एकेकाळी ते माओवादी बनण्यासाठी जाणार होते. त्यांच्या बायोपिकबद्दल शाहिद म्हणाला की, डिंको यांची कथा खूप मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. अशा नायकांची कथा लोकांना सांगण्याची खूप गरज आहे.शाहिद कपूरला डिंको सिंग यांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

टॅग्स :शाहिद कपूर