शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने तोडला वाहतूक नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2017 4:41 AM
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याची लाडकी बेटरहाफ मीरा राजपूत आणि तेवढीच लाडकी मुलगी मीशा हिच्यासोबत फॅमिली टाईम एन्जॉय ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याची लाडकी बेटरहाफ मीरा राजपूत आणि तेवढीच लाडकी मुलगी मीशा हिच्यासोबत फॅमिली टाईम एन्जॉय करतोय. अलीकडे शाहिद कपूर मीरासोबत लन्च डेटला गेला होता. याठिकाणी मीराने शाहिदला भलतेच अडचणीत आणले. त्याचे झाले असे की, मीरामुळे शाहिदच्या खिशाला २ हजार रूपयांची चाट बसली. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याबद्दल शाहिदला मुंबई वाहतूक पोलिसांनी २ हजार रूपयांचा दंड ठोकला.शाहिद व मीरा हे दोघेही मीशासोबत एका किचन गार्डन रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेले होते. गाडी पार्क केली आणि तिघेही रेस्टॉरंटमध्ये गेले. येथे मस्तपैकी लंच डेट एन्जॉय केल्यानंतर शाहिद व मीरा बाहेर आलेत. तेव्हा वाहतूक पोलिसांनी त्यांच्या हाती चालान थोपवले. गाडी नो पार्किंगमध्ये उभी होती. विशेष म्हणजे मीरा ड्राईविंग करत होती, त्यामुळे हे चालान तिच्याच नावाने फाडले गेले. आता चूक झाली तर ती मान्य तर करावीच लागणार ना. अखेर या सेलिब्रिटी कपलने कुठल्याही वादविवादाशिवाय स्वत:ची चूक मान्य केली आणि दंडाची रक्कम भरली. तसे मीराने याआधीही शाहिदला असेच अडचणीत आणले होते.अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने अलीकडे कामकाजी महिलांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे करिअर महत्त्वाचे वाटते. फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. जर असंच करायचे असते तर मला तिची गरजच काय होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे, असे मीरा या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाले होते. या वादानंतर शाहिदला मीराचा बचाव करत मैदानात उतरावे लागले होते.ALSO READ : OMG !! वर्गमित्राने मीरा राजपूतबद्दल केले धक्कादायक खुलासे!शाहिद सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. फावला वेळ आपल्या कुटुंबाला देणे शाहिदला आवडते.