काट्याच्या लढतीत शाहरुखचीच सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:14 AM
शाहरुख खानचा दिलवाले आणि भंसालीचा बाजीराव मस्तानी या दोघांमध्ये दर्शक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंत करतात त्याची. याचा परिणाम तर ...
शाहरुख खानचा दिलवाले आणि भंसालीचा बाजीराव मस्तानी या दोघांमध्ये दर्शक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंत करतात त्याची. याचा परिणाम तर सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. मात्र एवढे नक्की आहे की ही काट्याची लढत आहे आणि अशा काट्याच्या लढतीत अनेकदा शाहरुखच भारी पडला आहे.बॉक्स ऑफिसवर बादशाही गाजवणार्या शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीत अशा कित्येक स्पर्धा अनुभवल्या आहेत. विशेषत: दिवाळीच्या काळात शाहरुख खानच्या चित्रपटांना दुसर्या मोठय़ा चित्रपटांचा सामना करावा लागला आहे, मात्र दिवाळी नेहमी शाहरुख खानला भाग्याची ठरली आहे. असाच सामना २0१२ मध्ये 'जब तक है जान' सोबत अजय देवगनच्या सन ऑफ सरदार या चित्रपटाशी झाला होता, ज्याच्यात दोन्ही चित्रपटांनी शंभर कोटींच्या कमाई करणार्या क्लबमध्ये जागा बनविली होती पण चर्चा झाली ती 'जब तक है जान'चीच. याचप्रमाणे २00४ मध्ये वीर-झराच्या बरोबरीत अब्बास मस्तानचा ऐतराज प्रदर्शित झाला. यावेळीही शाहरुखने बाजी मारली. तसेच कुछ कु छ होता है च्या विरुद्ध डेविड धवनचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट आला होता. पण, कुछ कु छ होता है हा सिनेमाच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.चेन्नई एक्स्प्रेसच्या समोर वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन चे आव्हान होते. पण, अक्षय कुमार आणि इमरान खान सोबत सोनाक्षी सिन्हा यांचा हा चित्रपट चेन्नई एक्सप्रेसच्या गतीला पार करू शकला नाही. २00६ मधील डॉन या शाहरुख खानच्या चित्रपटाचा सामना सलमान खान आणि अक्षय कुमारचा जानेमन करू शकला नाही.