बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) लाडका आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्न केसप्रकरणी जामीन मिळाल्यावर घरी परतला. मन्नत बाहेर फॅन्सने आणि मन्नतच्या आत कुटुंबियांनी आर्यन खानचं स्वागत केलं. गेले २८ दिवस हे आर्यन खानसाठी एखाद्या भयावह स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तुरूंगातील ते कठीण दिवस आर्यन आयुष्यभर विसरू शकणार नाही.
आर्यनसाठी खास रूटीन
विषयाचं गांभीर्य समजून घेऊन शाहरूख खान आणि गौरी खान त्याच्यासाठी खास रूटीन प्लॅन तयार केला आहे. इतक्या कमी वयात तुरूंगात जाणे, वादात सापडणे...कुणाच्याही मानसिक स्थितीवर प्रभाव पाडू शकतं. त्यामुळे आर्यन खानचं लाइफ बॅक टू नॉर्मल करण्यासाठी किंग खान आणि गौरी खान खास तयारी करत आहे. जेणेकरून आर्यन खान तुरूंग आणि ड्रग्स केसच्या ट्रॉमातून लवकर बाहेर येईल.
बॉलिवूड लाइप वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, आर्यन खानला अनेक हेल्थ चेकअपमधून जावं लागणार आहे. आर्यनचं न्यूट्रिशन आणि त्याच्या चांगल्या डाएटवर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. त्याला काही ब्लड टेस्टही करावे लागणार आहेत. तुरूंगात राहिल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कारण आर्यनने तुरूंगात व्यवस्थित जेवणंही केलं नव्हतं. अशात आई गौरीला मुलाच्या आरोग्याची काळजी आहे.
फिजिकल चेकअपशिवाय, आर्यनच्या मेंटल हेल्थवरही खास लक्ष दिलं जाणार आहे. शाहरूख खान आणि गौरी खानने मुलासाठी काउन्सेलिंगचा प्लॅन केला आहे. जेणेकरून तो आपल्या जीवनाच्या त्या चॅप्टरमधून बाहेर पडावा, ज्याने त्याला आतून तोडलं आहे. तो आर्यनला पार्टी आणि पब्लिकच्या नजरेपासून दूर ठेवणार आहे.