Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानविरोधात एफआयआर (FIR) दाखल करायची कोणाची हिंमत होईल का. तुझ्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे असं कोणी थेट शाहरुखला म्हणेल का. पण हो असं झालंय, ट्विटरवर एका चाहत्याने शाहरुखला एफआयआर दाखल करेल अशी धमकी दिली आहे. पण त्यामागचं कारणही मजेदार आहे.
शाहरुख खानट्विटरवरुन asksrk सेशन घेतो ज्यामध्ये तो चाहत्यांशी थेट संवाद साधत असतो. दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला उद्देशून ट्वीट केले की, 'खान साब, तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करत आहे. कारण हा माणूस खोटे बोलतो की तो ५७ वर्षांचा आहे.'
चाहत्याच्या या भन्नाट ट्विटवर शाहरुखनेही मजेदार रिप्लाय दिला आहे. शाहरुख म्हणतो, "प्लीज असं नको करु. ठिक आहे मी मान्य करतो की मी ३० वर्षांचा आहे. आता मी तुला सत्य सांगितलं आहे. म्हणूनच माझ्या पुढच्या सिनेमाचं नावही 'जवान' आहे."
शाहरुखने काल संध्याकाळी हे asksrk सेशन घेतले. तो नेहमीच या सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं देत असतो. शाहरुख आणि चाहत्यांमधील हे सेशन मजेदार असते. अनेक वेळा काही गंभीर प्रश्नांनाही शाहरुख त्याच्यापद्धतीने सडेतोड उत्तरं देत असतो. शाहरुख सध्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या 'पठाण'सिनेमाने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात पठाणने तब्बल 500 कोटींचा गल्ला जमवला आहे.