मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान (Aryan Khan) शनिवारी घरी परतला. 28 दिवसांनी आर्यनला पाहून शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खानला (Gauri Khan) दिलासा मिळाला. दरम्यान, आर्यनची बहीण सुहाना खानही (Suhana Khan) लवकरच आपल्या भावाला भेटण्यासाठी मुंबईला परत येऊ शकते, असे वृत्त आहे. यापूर्वी सुहाना नोव्हेंबरमध्ये परतणार होती. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे तिला येण्यास मनाई करण्यात आली होती. (Suhana Khan Arrive Mumbai Soon)
सुहाना खान लवकरच परतू शकते मुंबईत -सुहाना आणि आर्यन यांचे एकमेकांशी खूप क्लोज संबंध आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुहाना खान आधीच मुंबईत येण्याच्या तयारीत होती. शाहरुख खानचा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढदिवस असतो, त्यासाठी सुहाना मुंबईत येऊ शकते, असे बोलले जात होते. मात्र, ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्याने आर्यन खानची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाली. यामुळे संपूर्ण खान कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता, खान कुटुंबाने सुहानाला न्यूयॉर्कमध्येच थांबण्याचा आणि सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतरच परतण्यास सांगितले होते.
आता आर्यन त्याच्या घरी परतल्याने सुहाना खानही लवकरच मुंबईत येऊ शकते. सुहानाही याचीच वाट पाहत होती. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी मिळताच तिने तिच्या भावासोबतचा बालपणीचा एक गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर करत, आपले प्रेम व्यक्त केले होते. हा फोटो शेअर करताना सुहानाने कॅप्शनमध्ये 'आय लव्ह यू' असे लिहिले आहे. यावरूनच सुहाना आपल्या भावावर किती प्रेम करते, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे.
हेही वाचा -
- कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी? एका सुनावणीसाठी किती घेतात फी?
- सोपं नसेल आर्यन खानचं पुढचं आयुष्य; 'या' 14 अटींपैकी एकही तुटली, तरी रद्द होणार जामीन!