चित्रपट समीक्षकांपैकी एक चर्चेतलं नाव म्हणजे राजीव मसंद (Rajeev Masand). सध्या ते करण जोहरच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी धर्माचे सीओओ आहेत. नुकताच त्यांनी फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्राच्या (Anupama Chopra) पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शाहरुख खानबाबत एक किस्सा सांगितला. शाहरुख खानने (Shahrukh Khan) सर्व त्यांच्या मुलाखतीत इतर अभिनेत्यांची स्तुती करण्यास नकार दिला होता.
अनुपमा चोप्राच्या 'ऑल अबाऊट मुव्हीज' पॉडकास्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये राजीव मसंद यांनी अनेक किस्से सांगितले. सेलिब्रिटींना कसा इगो असतो आणि मोठे स्टार्स नवोदित कलाकारांसोबत काम करायला तयार होत नाहीत याबद्दलही त्यांनी भाष्य केले. फिल्मच काय तर मोठे स्टार्स इतर कलाकारांसोबत मुलाखतीही देत नाहीत. जरी सहभागी झालेच तरी त्यांचा इगो राखतात.
राजीव मसंद म्हणाले,'एक्टर्स राऊंडटेबल मुलाखतीत अनेक सेलिब्रिटी एकत्र येतात आणि मी त्यांच्याशी एकत्रित गप्पा मारतो. एकाच टेबलवर बसून सर्व कलाकार एकमेकांशी गप्पा मारतात. कोणी सर्वात चांगलं काम केलं कोणाची भूमिका खूप आव्हानात्मक होती अशा गप्पा मुलाखतीत होतात. मात्र सध्या अभिनेत्यांना एकत्र बोलावून मुलाखत घेणं फार कठीण झालं आहे. एका शेड्युलसाठी शाहरुख खानने मला थेट नकार दिला होता. तो म्हणाला मला अभिनेत्रींच्या राऊंडटेबलला बोलवा मी त्यांच्यासोबत बसेन. पण मी दुसऱ्या अभिनेत्यांची (हिरोंची) स्तुती करु शकत नाही.'
याच मुलाखतीत त्यांनी आणखी एका अभिनेत्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले,'एकदा एका मोठ्या कलाकाराने मला सांगितले की मुलाखतीत अमुक एक अभिनेता असेल तर मी येणार नाही. जेव्हा की तो ज्या अभिनेत्याबद्दल बोलत होता तो अभिनेता मुलाखतीत येण्यासाठी पात्र होता. तो तरुण होता नवीन होता.आता मला माहित नाही की ही मागणी त्या अभिनेत्याची होती की त्याच्या पीआर टीमची. कारण अनेकदा पीआर टीमच परस्पर निर्णय घेऊन मोकळी होते.'
राजीव मसंद यांनी आता चित्रपट समीक्षण करणं सोडलं आहे. मात्र ते अजूनही अॅक्टर्स राऊंड टेबल करतात. यातून अभिनेत्यांची कामाची पद्धत समजते. या राऊंडटेबलवर आतापर्यंत अमिताभ बच्चन, इरफान खान, अक्षय कुमार, राजकुमार राव, रणबीर कपूर आणि सुशांतसिंग राजपूत सारखे अनेक कलाकार आले आहेत.